You are currently viewing संवाद मीडियाची बातमी ठरली खरी

संवाद मीडियाची बातमी ठरली खरी

सावंतवाडीतील बेपत्ता बँक अधिकारी सुखरूप घरी

ओटवणे नदीपासून काही अंतरावर आपली ह्युंडाई कार लावून गाडीत आपण आत्महत्या करत असून त्यास जबाबदार असलेल्या व्यक्तींची नावे लिहून आपला मोबाईल फोन गाडीतच सोडून मनोहर गावडे हे बेपत्ता झाले होते. आपले पती रात्री घरी न परतल्याने मनोहर गावडे यांच्या पत्नीने सकाळी पोलीस स्टेशनमध्ये बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. त्यानंतर ओटवणे येथे कार असल्याची माहिती मिळाल्यावर आत्महत्या केल्याची दृष्टीने पोलिसांनी आजूबाजूच्या जंगलात व जवळपास नदीपात्रात शोध सुरू केला होता.
बेपत्ता असलेले मनोहर गावडे यांचा तेरेखोल नदीपात्रात बाबल आलमेडा यांच्या रेस्क्यू टीम ने शोध घेऊनही काहीच पत्ता लागला नव्हता, तसेच आजूबाजूच्या जंगल भागातही शोधून काहीच थांगपत्ता लागला नाही. दोन दिवस काहीच पत्ता न लागल्याने संवाद मीडियाने बेपत्ता अधिकारी यांची आत्महत्या की आत्महत्येचा स्टंट या मथळ्याखाली बँक अधिकारी गायब बाबत संशय व्यक्त केला होता. संवाद मीडियाचा हा संशय खरा ठरला असून आयसीआयसीआय बँकेचे अधिकारी मनोहर गावडे हे आज कारीवडे येथील आपल्या घरी परतले असून त्यांच्या भावाने सावंतवाडी पोलीस स्टेशनचे तपासी अंमलदार तौफिक सय्यद यांना फोन करून मनोहर गावडे सुखरूप घरी पोहोचल्याची खबर दिली आहे. सावंतवाडी पोलीस खबर मिळताच त्यांच्या घरी रवाना झाले आहेत.
आपल्यावर आलेल्या संकटामुळे स्वतःला सोडविण्यासाठी पोलीस यंत्रणा व सामाजिक कामात हिरहिरीने उतरणारे बाबल आलमेडा व सहकारी, ग्रामस्थ आदी यंत्रणेला नाहक शोध कार्य करून त्रास देणे कितपत योग्य असा सवाल सर्वसामान्य नागरिक उपस्थित करीत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा