You are currently viewing कामगार विरोधी धोरणाच्या निषेधार्थ ४ ऑक्टोबरला एकदिवसीय देशव्यापी संप – कमल परुळेकर

कामगार विरोधी धोरणाच्या निषेधार्थ ४ ऑक्टोबरला एकदिवसीय देशव्यापी संप – कमल परुळेकर

अंगणवाडीसह कामगार संघटनांना सहभागी होण्याचे आवाहन…

सिंधुदुर्गनगरी

कामगार विरोधी धोरणाच्या निषेधार्थ अंगणवाडी सह कामगार संघटनानी ४ ऑक्टोबरला रोजी देशव्यापी एकदिवशीय संप आयोजीत केला आहे. तरी हा संप यशस्वी करावा असे आवाहन कमलताई परूळेकर यांनी केले आहे.

केंद्र शासनाच्या कामगारविरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी देशातील सर्व योजना कर्मचारी यानी देशव्यापी संप करण्याचा एच एम एस,आयटक,सीटू इंटक वगैरे केंद्रीय संघटनानी निर्णय केला आहे.त्यात सर्व अंगणवाडी संघटना,आशा व गटप्रवर्तक संघटना,शालेय पोषणस्वयंपाकी,आहार पूरवठा करणारे घटक,मनरेगा कामगार,इ.योजना कर्मचारी सहभागी होत आहेत. २४ सप्टेंबरला एक दिवसाचा संप करणार आहेत.कामबंद ठेवून केंद्सरकारचा निषेध करून राज्य सरकारचेही प्रलंबीत प्रश्नांकडे लक्ष वेधणार आहेत.
योजना कर्मचा-यांमध्ये महिला कर्मचारी मोठ्या प्रमाणात आहेत.त्यांना शासकीय कर्मचा-यांचा दर्जा मिळावा,वेतन द्यावे,सामाजिक सुरक्षा लाभ द्यावेत या प्रमुख मागण्यांसाठी देशभर मोर्चे,सत्याग्रह,जेलभरो इ.कार्यक्रम होत आहेत.जिथे कोरोनामुळे जमावबंदी आदेश आहेत,तिथे फक्त कामबंद आंदोलन करायचे आहे.सिंधुदूर्गातील सर्व अंगणवाड्या त्यादिवशी अंगणवाडी बंद आंदोलन करतील असे अंगणवाडी कर्मचारी सभेच्या सरचिटणीस कमलताई
परूळेकर यानी सांगीतले.
सर्व कर्मचारी देशाच्या तळागाळातील जनतेला मूलभूत सेवा देत असतात,त्याना कोरोना लस प्राधान्याने द्यावी,बाधीत झाल्यास दहा हजार रूपये नुकसान भरपाई द्यावी,त्याना सुरक्षा साधने पुरवावीत,त्याना कोविड झाल्यास मोफत उपचार,प्राधान्याने द्यावेत,,सर्वाना माणशी १० किलो मोफत धान्य द्यावे आणि सार्वजनिक क्षेत्राचे खाजगीकरण बंद करावे या प्रमुख मागण्या असून अंगणवाडी कर्मचारी याना सरकारी नोकर मानून,पगार द्यावा,निकृष्ट मोबाईल बदलून टॅबलेट मोबाईल द्यावेत, सादील खर्च वर्षाला २ हजार रूपये देतात ,तो ५ हजार करावा.इमारत भाडे वाढवून मिळावे,लग्न किवा पतीची बदली या कारणांसाठी अंगणवाडी कर्मचारीना बदलीची संधी द्यावी,मिनी अंगणवाडीची मोठी अंगणवाडी करावी व तिलाही मदतनीस द्यावी,आहाराचा दर कूपोषित मुलांसाठी प्रत्येकी १६ रूपये व स्तनदा, गरोदर स्त्रीयांसाठी १८ रूपये करावा.
अंगणवाडीला दिले जाणारे साहीत्य व औषधे अंगणवाडीपर्यंत पोचवावीत या व इतर मागण्यांसाठी हा संप आहे.
सर्व प्रकल्पाना नोटीसा दिल्या आहेत,त्यामुळे कोणीही त्यादिवशी बीट मीटींग ठेवू नये व ठेवल्यास कोणीही येणार नाहीत याची एकात्मिक बालविकास विभागाने दखल घ्यावी .असेही कमलताई परूळेकर यानी स्पस्ट केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा