जागतिक मराठी “साहित्य कला व्यक्ती” विकास मंचच्या सदस्या, विविध पुरस्कार प्राप्त जेष्ठ कवयित्री प्रा.सौ. सुमती पवार यांची “अहिराणी, खानदेशी” बोलीभाषेतील काव्यरचना
मानूसना सभावले नही कोनत औसद
काय बोली जाई देखा कोनता वखत
डूख धरीनी मनमा वाट दखस संधीनी
आनि मंग एकदम डकस दखताज पर्वणी…
म्हने सुधरीजास सभाव .. तुमले तरी पटस ?
संधी येताज दखा मानुस लगेज खेटस
भला भला शिकेल इद्वान दखात मी
धाकला पोऱ्या तरी बरा असा वागतसं….
डूख धरी बठतंसं मांगलं उकरी काढतंस
यासले कसं मोठं म्हनो, मानोसले प्रश्न पडतंस
भलता हलकट हो.. त्यासनी बुद्धी दखीन नवल लागस
नुसता वाढना एरंड , दिनभर डसका भरतंस ….
हात टेकी देवो बरं.. यासना नांदे नई लागो
तू मोठा तुना बाप मोठा असं त्यासले सांगो
नांदे लागीन पच्छातापज येस वाटाले
असं वाटंस कसाले गऊ माय मी खेटाले…
काही बी करा , त्या बदतंस नही म्हनजे नही
खरं सांगस तुमले त्या बदलाव नहीत
उगमुग ऐकी लेवो , हा रे भाऊ म्हनो
कसाले जिंदगी खराब करो.. पागल से तो
आपले ऱ्हास ना माहित …
सभाव बदलतां ते जग बदली जातं ..
व्हयनं का तसं? व्हवाव नही
सोडी देवो त्याले .. जो तो आपलं करमनं खाई
बहुरत्ना वसुंधरा.. असा रत्ने ऱ्हातसज
खाजकुईरीनं गत त्या लोकेसले भंडाडतसज…
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)