You are currently viewing शासकीय व्हायरल चाचणी केंद्राचे लोकार्पण..
"व्हायरल चाचणी केंद्राचे लोकार्पण माजी मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले.

शासकीय व्हायरल चाचणी केंद्राचे लोकार्पण..

नारायण राणे यांच्या पडवे येथील मेडिकल कॉलेज मध्ये शासकीय व्हायरल चाचणी केंद्राचे लोकार्पण..

विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते झाले उद्घाटन…

कोरोनाच्या संकटामुळे देशात कोविड-19 च्या तपासणी केंद्रांची आवश्यकता भासू लागली. महाराष्ट्रात कोरोनाने तर जास्तच हातपाय पसरले त्यामुळे रॅपिड टेस्ट होणे गरजेचे झाले. कोकणात कोरोनाने उशिरा शिरकाव केला परंतु सिंधुदुर्गात कोरोना तपासणीसाठी लागणारी अद्ययावत लॅब उपलब्ध नव्हती. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गरज ओळखून भाजपाच्या महाराष्ट्रातील पाच आमदारांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात व्हायरल चाचणी केंद्रासाठी निधी उपलब्ध करून दिला होता. नारायण राणे यांच्या मेडिकल कॉलेजमध्ये अद्ययावत व्हायरल चाचणी केंद्र उभारणीचे काम वेगाने चालू होते. माजी मुख्यमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते या चाचणी केंद्राचे लोकार्पण झाले.

कोरोनाच्या लढ्यात महाराष्ट्र देशात हॉटस्पॉट बनला आहे, कोरोनाचा मृत्यू दर जास्त असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण महाराष्ट्रात कमी आहे, त्यामुळे ही परिस्थिती बदलण्यासाठी महाराष्ट्रात आरटीपीसीआर टेस्ट जास्तीतजास्त प्रमाणात होणे गरजेचे आहे. तरच महाराष्ट्राची परिस्थिती बदलेल असा विश्वास माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नारायण राणे यांच्या मेडिकल कॉलेजमध्ये  “व्हायरल चाचणी केंद्र” लोकार्पण प्रसंगी व्यक्त केला.

राज्याचे विधांपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी बोलताना सांगितले की, कोरोनाने कोकण बेजार झाले असताना आरोग्य यंत्रणा आणि राज्य सरकार अपयशी ठरले होते. अशावेळी देवेंद्र फडणवीस यांनी राज्यभर दौरा केला आणि कोरोना योद्धा ठरले. त्यामुळे राज्यात पर्यायी सरकार म्हणून भाजपावर आरोप झाले. पण आपण थांबलो नाही, कोकणात १५ दिवस चाचणी अहवाल मिळत नसल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगताच, कोकणात चाचणी केंद्र होणे गरजेचे असल्याने आम्ही पाच आमदारांनी निधी देण्याचे निश्चित केले आणि कोकणात तिन्ही जिल्ह्यात केंद्रे सुरू झाली. आम.रवींद्र चव्हाण व प्रसाद लाड यांनीही विचार व्यक्त केले.

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे भाग्यविधाते माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे आभार व्यक्त करताना म्हणाले, हॉस्पिटल चे उद्घाटन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले होते, आज चाचणी केंद्राचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले, पुढील तीन महिन्यात मेडिकल कॉलेजचे उद्घाटन सुद्धा त्यांच्याच हस्ते पार पडणार आणि मेडिकल कॉलेजमधून १५० मुले शिक्षण घेतील त्यांनाही या चाचणी केंद्राचा जवळून अभ्यास करता येईल. यावेळी खासदार राणे यांनी देवेंद्र फडणवीस, दरेकर यांच्यासह आम.रविंद्र चव्हाण, आम.गिरकर, आम.प्रसाद लाड, आम.रमेश पाटील, आम.निरंजन डावखरे या निधी देणाऱ्या सर्व आमदारांचे आभार मानले. तसेच “तुमचा निधी जनतेच्या सेवेसाठी लागत आहे, तुमचे वय आणि उमेद पाहता तुम्ही तरुण आहात, खूप अभ्यास आणि प्रामाणिक प्रयत्न करून राज्याचा राजकारणात कोकणचा ठसा उमटवा” असा सल्लाही दिला.

या लोकार्पण सोहळ्यास खासदार राणे, आम.रविंद्र चव्हाण, विधांपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर, आम.प्रसाद लाड, आम.रमेश पाटील, आम. निरंजन डावखरे, आम.भाई गिरकर, निलम राणे, आम.नितेश राणे, मा.खासदार निलेश राणे, राजन तेली, प्रमोद जठार, अजित गोगटे, जि प अध्यक्षा समिधा नाईक, हॉस्पिटल डीन आर एस कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी पडते, डॉ. मिलिंद कुलकर्णी, आनंद सावंत आदी उपस्थित होते.

“व्हायरल चाचणी केंद्राचे लोकार्पण माजी मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा