You are currently viewing राज कुंद्राला अखेर जामीन मंजूर…

राज कुंद्राला अखेर जामीन मंजूर…

अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती आणि उद्योजक राज कुंद्रा याला अखेर जामीन दिलासा मिळाला आहे. अश्लील चित्रपट प्रकरणात न्यायदंडाधिकारी कोर्टाने कुंद्रा याला आज जामीन मंजूर केला. त्यासोबत कुंद्राच्या कंपनीचा आयटी प्रमुख रायन थॉर्प यालाही जामीन मंजूर करण्यात आला आहे.

पोर्नोग्राफी प्रकरणात गुन्हे शाखेकडून तपास सुरू असून राज कुंद्रा आणि अन्य तीन जणांवर अलीकडेच पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. पोर्गोग्राफिक फिल्सची निर्मिती करून काही अ‍ॅपच्या माध्यमातून त्याचे प्रसारण केल्याचा आरोप या सर्वांवर करण्यात आला आहे. राज कुंद्रा याला या प्रकरणात १९ जुलै रोजी अटक करण्यात आली होती. भारतीय दंड विधानाची विविध कलमं आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याखाली त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली होती. गेल्या दोन महिन्यांपासून कुंद्रा न्यायालयीन कोठडीत आहे. दोन महिन्यांनंतर त्याला जामीन दिलासा मिळाला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा