सक्रीय रुग्णांची संख्या 1 हजार 327
– जिल्हा शल्य चिकित्सक
सिंधुदुर्गनगरी
जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 48 हजार 688 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 1 हजार 327 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 38 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.