-सलग चार वेळा अध्यक्ष पदी निवड
वैभववाडी-
ग्रामपंचायत पंचायत सडूरे शिराळे च्या झालेल्या ग्रामसभेमध्ये गावच्या तंटामुक्ती अध्यक्ष पदाची निवड करण्यात आली या निवडीमध्ये सलग तीन वर्ष अध्यक्ष पद भूषविलेले दीपक यशवंत चव्हाण यांची पुन्हा एकदा फेरनिवड करण्यात आली. सलग चार वर्ष चव्हाण यांची अध्यक्षपदी निवड होत आहे. यावेळी त्यांची निवड करून पुन्हा एकदा एक वर्षासाठी त्यांना तंटामुक्ती अध्यक्ष पदावर ती काम करण्याची संधी मिळाली आहे या संधीचं सोनं करून ते गावाला तंटे पासून लांब ठेवतील व भविष्यात असणारे तंटे सोडून योग्य निर्णय घेऊन गावाला तंटा मुक्त ठेवतील अशी आशा व्यक्त करून ग्रामसभेने त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. ग्राम सभेचे पदसिद्ध अध्यक्ष प्रभारी सरपंच संतोष पाटील या सभेत अनुपस्थित होते. त्यामुळे ही ग्राम सभा माजी विस्ताराधिकारी एन डी बोडेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य नवलराज काळे, ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मीबाई बोडेकर, ग्रामसेवक प्रशांत जाधव, तलाठी अक्षय लोणकर, माजी पोलीस पाटील प्रकाश रावराणे, दीपक चव्हाण, अरुण रावराणे, महात्मा गांधी
ग्रामीण रोजगार सेवक दीपक भावे, उदय राहाटे, हरिश्चंद्र माने, महेंद्र जंगम, संभाजी रावराणे,श्री.राणे, सुधीर बाने, गणपत पाटील, ग्रामपंचायत कर्मचारी सुनील राऊत व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.