बांदा :
डेगवे,आंबेखणवाडीतील “श्री ब्राह्मणी स्थळी “श्रावण महिन्यातील ५ सोमवार व भाद्रपदातील २ सोमवार मिळून एकूण ७ सोमवारचे व्रत ग्रामस्थ व स्त्रिया,मुले उपवास करतात. रात्री भजन करतात. व नंतर ७ व्या सोमवारी न चुकता ग्रामदेवतेच्या अर्थात श्री माऊली चरणीं,४८ खेड्याचा श्री स्थापेश्वर चरणीं तसेच आंबेखणवाडीतील ब्राह्मणीस्थळातील सार्वजनिक तुळशीवृंदावन चरणीं अभिषेक ( एकादशी) करतात.व ते तिर्थ घेतात.व नंतरच दुसऱ्या दिवसापासून मासांहार करण्यास या वाडीतील ग्रामस्थ प्रारंभ करतात.हि परंपरा गेल्या शंभर,सव्वाशे वर्षे चालली आहे.यंदा हा अभिषेक सोमवार दि.२०सप्टेंबर २०२१ रोजी सकाळी १० वाजता श्री माऊली चरणीं सकाळी ११.३० वाजता श्री महालक्ष्मी,स्थापेश्वर चरणीं तसेच दुपारी १.०० वाजता श्री ब्राह्मणीस्थळातील तुळशीच्या चरणीं आयोजित केला आहे.तरी डेगवे,आंबेखणवाडीतील ग्रामस्थ बांधवांनी,भाविकांनी उपस्थित राहून तिर्थ प्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन श्री ब्राह्मणी तिर्थक्षेत्र देवस्थान समिती,आंबेखणवाडी वतीने डेगवे ग्रामस्थ हितवर्धक संघाचे सरचिटणीस उल्हास देसाई यांनी केले आहे.
सोबत फोटो : श्री ब्राह्मणी तिर्थक्षेत्र,आंबेखणवाडी