जागतिक मराठी साहित्य कला व्यक्ती विकास मंचचे सदस्य राष्ट्रीय प्रतिभा पुरस्कारित जेष्ठ लेखक कवी प्रा.डॉ.जी.आर.प्रवीण यांची काव्यरचना.
नवे राग अन नवे तराणे
ओठवरती तुझेच गाणे
नाही स्वरांची कधी कमतरता
कधी नक्षत्रांचे अधीर देणे
स्वरांगना चे पिठुर चांदणे
ओठवर ती तुझेच गाणे
नको नको ते तुझे ते रूसणे
मांडू बंदिश पुन्हा नव्याने
सरगम उठती झंकारा ने
ओठवर ती तुझेच गाणे
मैफिली मधे तुझेच असणे
स्वर्ग सुंदरी चे असते देणे
स्वरांची ही कधी तरतमता
वादी संवादी तू लावून जाणे
अळवू नको ते स्वर भैरवी चे
तुझेच गीत अन माझे गाणे
उतरून यावा गन्धर्व इथे ही
तुझ्याच ओठी तुझे च गाणे
प्रो डॉ जी आर उर्फ प्रवीण
ज्येष्ठ कवी लेखक,बेलगांव
(राष्ट्रीय प्रतिभा पुरस्कारीत )