-जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अमित यादव
सिंधुदुर्गनगरी
ज्या वाहनवर ई चलान अनपेड केसेस आहेत, त्या वाहनधारकांनी थकित असलेली दंडाची रक्कम उद्या १७ ते २४ सप्टेंबरपर्यंत भरणा करावी. सर्व पोलीस ठाणे, जिल्हा वाहतूक शाखा, खारेपाटण व पत्रादेवी तपासणी नाका या ठिकाणी दंडाची रक्कम स्वीकारली जाणार आहे, असे आवाहन जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी केले.
कोव्हीड-१९ च्या काळात मे-२०१९ पासून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालक, वाहनमालक यांच्यावर ६३ हजार ८९७ अनपेड इ चलान केसेस करण्यात आलेल्या आहेत. यात १ कोटी ६५ लाख दंडाची रक्कम वसूल करण्याकरिता मुंबई उच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार विधी व सेवा प्राधिकरणामार्फत २५ सप्टेंबर रोजी लोक अदालत भरविण्यात येणार आहे.
जे वाहनधारक थकित दंडाची रक्कम भरणार नाहीत, त्यांना विधी व सेवा प्राधिकरणामार्फत २५ सप्टेंबर रोजीच्या लोक अदालतीत दंडाची रक्कम भरण्याकरिता नोटीस पाठविण्यात येणार आहे. अनपेड चलान दंड वसुलीसाठी ९३०७६८०६०१ आणि ९६७३९०७४९८ या हेल्पलाईनवर संपर्क साधावा. वाहतुकीचे नियम पाळून रस्ते अपघात टाळण्यास वाहनचालकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही केले आहे.