जागतिक मराठी “साहित्य कला व्यक्ती” विकास मंचच्या सदस्या, विविध पुरस्कार प्राप्त जेष्ठ कवयित्री प्रा.सौ. सुमती पवार यांची काव्यरचना
विघ्नहर्त्या देवा तुझे नाम रोज घ्यावे
कर्म केले आम्ही ते तुलाच अर्पावे
तू येता होती पहा खुष सारे जगी
आवडती मोदक ते खूप तुला द्यावे …
टिल्लू तुझा उंदिर रे किती किती छान
तुरू तुरू पळतो नि डोलवितो मान
पायी तुझे चाळ किती रूणूझुणूझुणू
लंबोदर शूर्पकर्ण काय काय म्हणू ….
दात तुझे भले मोठे वाटते रे भीती
दिसतात गळ्यातले छान किती मोती
मखरात बसलास हसतोस छान
मुकूटात हिरा तुझा वाढवितो शान …
भल्यामोठ्या पोटात तू ठेवतोस काय
नाचतोस छान किती उंचावून पाय
हारतुरे प्रिय तुला दुर्वा आवडती
सारे जण प्रेमाने रे गातात आरती ….
मिष्किल ते हासू सांडे डोळ्यातून तुझ्या
तू येता सारी कडे मजा मजा मजा
दिस दहा देतोस तू खूप खूप मोद
निघताच वाटते रे दु:ख्ख आणि खेद ….
कृपा ठेव आम्हावरी आम्ही सारे तुझे
त्रिखंडात नाव तुझे रोज पहा गाजे
साऱ्यांचाच लाडका तू आवडतो फार
गणांचा तू गणपती हरएक तुला भजे…
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)