कोरोना महामारीत जीवाचा धोका पत्करुन सेवा बजावणार्या सिंधदुर्गातील होमगार्डना दोन महीन्याचे मानधन अद्याप मीळाले नसल्याने होमगार्ड संघटने मधुन नाराजीचा व्यक्त केली जात आहे.
गेली दोन वर्षे कोरोनाच्या संकटाने आर्थीक परिस्थती कोलमडली आहे. या काळात होमगार्ड संघटना जीव धोक्यात घालून सेवा बजावत होती. होमगार्डना अद्याप सेवा बजावलेले मानधन दिले जाते. महाराष्ट्रामध्ये होमगार्ड संघटना दुर्लक्षित आहे. होमगार्डना कायमस्वरुपी सेवा दिल्यास पोलीस खात्याचा भार कमी होणार आहे. तसेच होमगार्डना रोजगार उपलब्ध होणार आहे.
कोणताही भ्रष्टाचार नाही. केवळ मानधनावर सेवा बजावणारी होमगार्ड संघटना कोरोनाच्या संकट काळात जीव धोक्यात घालून सेवा बजावत आहे. कोरोना संकट काळात बजावलेल्या दोन महिन्यांचे मानधन अद्याप मीळालेले नाही. सिंधुदुर्गातील सर्वात मोठा गणेश उत्सव असतानाही नाममात्र मीळणारे मानधन न मिळाल्याने होमगार्ड संघटनेमधुन नाराजीचा स्वर उमटत आहे. लवकरात लवकर मानधन देण्याची मागणी होमगार्ड करत आहेत.