You are currently viewing कणकवली शहरातील नागरिकांसाठी उद्या कोव्हीशिल्डचे स्वतंत्र ४०० डोस

कणकवली शहरातील नागरिकांसाठी उद्या कोव्हीशिल्डचे स्वतंत्र ४०० डोस

लसीकरण मोहिमेचा लाभ घेण्याचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केले आवाहन

कणकवली

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्ह्यात अनेक ठिकाणी कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू केलेले असताना आता कणकवली शहरासाठी देखील कोव्हीशिल्ड लसीचे स्वतंत्र ४०० डोस उपलब्ध होणार आहेत. कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संजना सावंत यांच्याकडे ही मागणी केली होती. या मागणीनुसार संजना सावंत यांनी कणकवली शहराकरिता स्वतंत्र ​४०० डोस उपलब्ध करून देण्याचे मान्य केले असून, त्याची अंमलबजावणी उद्या बुधवार ​८ सप्टेंबर रोजी केली जाणार आहे. ​१८ वर्षावरील पहिला व दुसरा डोस यावेळी देण्यात येणार आहे.

कणकवली नगरपंचायत च्या नगर वाचनालय हॉलमध्ये कणकवली शहरातील लोकांकरिता कोव्हीशिल्डच्या ४०० डोस चे लसीकरण सकाळी ​९ वाजल्यापासून करण्यात येणार आहे. याकरिता आरोग्य कर्मचाऱ्यांचा स्वतंत्र स्टाफ देखील देण्यात आला आहे. अशी माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली. कणकवली शहरात कणकवली कॉलेज येथे देखील लसीकरण होत असून तेथे तालुक्यातील सर्वांना लसीकरणाचा लाभ दिला जातो. कणकवली नगर वाचनालयाच्या हॉलमध्ये सुरू करण्यात आलेले हे लसीकरण कणकवली शहरातील नागरिकांना प्राधान्य देण्यात येणार आहे. या लसीकरण मोहिमेचा लाभ घ्या असे आवाहन नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा