You are currently viewing परवानगीशिवाय लावलेले बॅनर जप्त करण्यात येणार : नगराध्यक्षा प्रियांका साळसकर

परवानगीशिवाय लावलेले बॅनर जप्त करण्यात येणार : नगराध्यक्षा प्रियांका साळसकर

देवगड

देवगड जामसंडे नगरपंचायत कार्यक्षेत्रामध्ये विनापरवाना तसेच परवानगी असलेले विविध प्रकारचे बॅनर्स,झेंडे लावण्यात येत असल्याने सदर बॅनर्स कालावधी समाप्तीनंतर ते अर्जदार यांचे कडून हटविण्यात येत नसल्याने शहराचे विदृपीकरण होत आहे. त्याचप्रमाणे नगरपंचायत कार्यक्षेत्रामध्ये देवगड बालोदयान,मांजरेकर नाका, व देवगड कॉलेजनाका,या ठिकाणी लावण्यात येत असलेल्या बॅनर्समुळे वाहतूकीस अडथळा निर्माण होत आहे. सदर गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेता देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या सभेमध्ये ठराव घेण्यात आला आहे याची माहिती नगराध्यक्षा प्रियांका साळसकर यांनी दिली आहे हा ठराव पुढीलप्रमाणे असून त्याची कार्यवाही यापुढे होणार असल्याचे त्यांनी सांगितले :

१. देवगड जामसंडे नगरपंचायत कार्यक्षेत्रामध्ये विविध प्रकारचे बॅनर्स, झेंडे लावण्याकरीता नगरपंचायतीची पुर्व
परवानगी घेणे आवश्यक आहे.
२. विना परवानगी बॅनर्स नगरपंचायतीकडून जप्त करण्यात येतील.
३. परवानगी घेऊन लावण्यात आलेल्या बॅनर्सची मुदत समाप्तीनंतर अर्जदार यांनी सदरचे बॅनर्स स्वत:हून
हटविणे आवश्यक आहे.अन्यथा नगरपंचायतीकडून बॅनर्स जप्त करण्यात येतील.
४. व्यावसायिक जाहीरातीचा बॅनर्सचा कमाल कालावधी १ वर्षाचा असेल.
५. शिबिरे, वाढदिवस, श्रध्दांजली, शुभेच्छा, इ.प्रकारची बॅनर्स करीता कमाल कालावाधी१५ दिवसांचा असेल.
६. सदरबाबत राजकीय पक्ष यांना माहीतीस्तव पत्र देणे.
सदरबाबत देवगड जामसंडे नगरपंचायतीस सहकार्य करावे असे आवाहन देवगड जामसंडे
नगरपंचायतीकडून करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा