You are currently viewing राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियानांतर्गत प्रशिक्षण

राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियानांतर्गत प्रशिक्षण

सिंधुदुर्गनगरी

राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान 2021-22 अंतर्गत जिल्हा तालुका,ग्रामपंचायत विकास आराखडयाबाबत ग्रामपंचायत विभागातर्फे 7 सप्टेंबर 2021 रोजी शरद कृषिभवन सिंधुदुर्गनगरी येथे प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षणाचे उद्घाटन जिल्हा परिषदे अध्यक्ष संजना सावंत व मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांच्या हस्ते सकाळी 11 वाजता होणार आहे अशी माहिती ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिपाली पाटील यांनी दिली.

            या प्रशिक्षण कार्यक्रमाचे स्वरुप पुढीलप्रमाणे आहे. जिल्हास्तरीय प्रशिक्षण ,कार्यशाळा, गणनिहाय नियुक्त केलेले सर्वप्रभारी अधिकारी व पर्यवेक्षिका (ए.बा.वि.से) यांचे दोन दिवसांचे उजळणी प्रशिक्षण.जिल्हा परिषदचे सर्व खातेप्रमुख, सर्व गटविकास अधिकारी आणि जिल्ह्यातील प्रमुख शैक्षणिक व सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी यांचे एक दिवशीय प्रशिक्षण . गटस्तरीय तांत्रिक छाणणी समितीचे सर्व सदस्य यांचे एक दिवशीय प्रशिक्षण. मुख्य लेखा व वित्त अधिकारी, जि.प च्या सर्व विभागंतर्गत कार्यरत व पंचायत समिती स्तरावरील कार्यरत लेखाधिकारी यांचे एक दिवशीय प्रशिक्षण. जिल्हा परिषद सदस्य यांचे एक दिवशीय प्रशिक्षण. पंचायत समिती सदस्य यांचे एक दिवशीय प्रशिक्षण.

            गट, तालुक्यास्तरीय प्रशिक्षण, कार्यशाळा, तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींचे सरपंच व ग्रामसेवक यांचे दोन दिवसांचे प्रशिक्षण. सर्व पंचायत समिती सदस्य .पं.सं.स्तरावरील सर्व खातेप्रमुख,तालुकास्तरावरील विविध खात्यांचे राज्य शासनाचे सर्व अधिकारी (Line Dept) सर्व विस्तार अधिकारी, पर्यवेक्षिक आणि तालुक्याचे प्रमुख शैक्षणिक व सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी यांची एक दिवशीय कार्यशाळा.

            गणस्तरीय प्रशिक्षण ,कार्यशाळा, गणस्तरीय खालील दोन कार्यशाळा घ्यावयाच्या आहेत. या कार्यशाळांची जबाबदारी गणनिहाय नियुक्त केलेल्या प्रशिक्षत विस्तार अधिकारी प्रभारी अधिकारी व प्रशिक्षित पर्यवेक्षिका यांचेवर आहे. गणातील सर्व ग्रामपंचायतींचे सर्व सदस्य , ग्रामस्तरीय संसाधन गटाचे सर्व सदस्य व सर्व विभागाचे जि.प.व राज्य शासन ग्राम स्तरावरील सर्व कर्मचारी यांची एक दिवशीय कार्यशाळा. गणातील सर्व ग्रामपंचायतींमधील स्वयंसहाय्यता गटांच्या ग्रामसंघाचे अध्यक्ष सचिव व कोषाध्यक्ष, अंगणवाडी सेविका, ग्राम बाल सरंक्षण समितीचे सदस्य आणि समुह संसाधन व्यक्ती यांची एक दिवशीय कार्यशाळा.

            तात्रिंक छाननी समिती सदस्य प्रशिक्षण, खातेप्रमुख , सामाजिक व शैक्षणिकसंस्थांचेप्रतिनिधी, मुख्य लेखा वित्त अधिकारी, जि.प विभागातील लेखाधिकारी, व पंचायत समिती स्तरावरील कार्यरत लेखाधिकारी यांच्या करिता प्रशिक्षण दिनांक 7 सप्टेंबर 2021 रोजी आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा