तुझ्याविन मी अधुरा सांगावे कसे
आठवांत तुझ्या सांग जगावे कसे.
तू दर्प माळलेला नयनांत मोहिनी
भूल पडण्या आधी सांग लपावे कसे.
ओठी खुलले गुलाब अंगात काटा
ओठांनी ओठांचे फुल तोडावे कसे.
रात पुनवेची होती धुंद मिठीत चंद्र
लाजरे रुपडे चंद्राचे मी पहावे कसे.
दिशा वाऱ्याची बदलते स्वभावासारखी
स्वभाव कुणाचे खरे सांग जाणावे कसे
फूल अंगणी माझ्या रस शोषतो भुंगा
बेईमान फुलाला सांग सोसावे कसे.
नयनांतून धारा वाहतील अश्रूंच्या
आसवांना पापण्यात दडवावे कसे.
आनंदाचे क्षण कितीक धडकतील
आनंदात त्या तुला सांग शोधावे कसे.
सहन केली दुःखे याहूनही मोठी
दुःखांना हृदयी अजूनी जपावे कसे.
(दिपी)✒️
©दीपक पटेकर, सावंतवाडी
८४४६७४३१९६