जिल्ह्यातील रेशन दुकानांवर निकृष्ट दर्जाचे तांदूळ वितरण केले जात आहेत. याबाबत मनसेकडून जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करण्यात आली होती. जिल्ह्याबाहेरील मिलर्स कडून निकृष्ट दर्जाचा तांदूळ जिल्ह्यामध्ये सप्लाय केला जात आहे. यामध्ये कणीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे. या तक्रारीच्या संदर्भात नुकतेच मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी वेंगुर्ले धान्य साठा गोडाऊन येथे अचानक भेट देऊन तेथील तांदळाची पाहणी केली.
यावेळी तहसीलदार वेंगुर्ले यांच्याशी चर्चा करण्यात आली. तांदुळाच्या उपलब्ध साठ्या पैकी काही साठा चांगला नाही, याचे वितरण करू नये असे शिष्ठ मंडळाकडून तहसीलदार यांना सांगण्यात आले. तर मनसेत या तक्रारीनंतर जिल्ह्यातील सर्व तहसीलदार यांना जिल्हाधिकारी यांनी अहवाल सादर करण्यास कळवल्याचे समजते, हे अहवाल रेशन धान्य दुकान धारकांच्या अहवाल असणार आहेत, त्यामध्ये रेशन दुकानदार धारकांनी याबाबत सत्य अहवाल सादर करावेत .तसेच सामान्य गोरगरीब लोकांनी रेशनिंग वरील तांदळा बाबत तक्रार असल्यास रेशन दुकान धारकांकडे तक्रार करावी. किंवा मनसे शी संपर्क करावा असे आवाहन करण्यात येत आहे. असे धीरज परब यांनी सांगीतले यावेळी नागेश गावडे, सिद्धांत बांदेकर, समिर वाळके उपस्थित होते.