नाम घेता श्रीकृष्णाचे
तन मन मंत्रमुग्ध होते.
सूर बासरीचा ऐकूनी
राधा देहभान विसरते.
खेळे गोपिकांच्या संगे
नखरे गोपिकांचे लटके.
खडा मारुनीया फोडे
कृष्ण दह्यादुधाचे मटके.
राधे संग नाते प्रितीचे
राधा-कृष्ण म्हणती जन.
मीरा प्रतिक भक्तीचे
मीरा कृष्ण भक्तीत लीन.
करी रक्षण दौपदीचे
येई भाऊ होऊनी पुढे.
रथाचा सारथी कृष्ण
रणात वीर अर्जुन लढे.
अष्टनायिकांचा पती देई
सोळा सहस्त्र स्त्रियां अभय.
असता पाठी सखा कृष्ण
नसे जीवनी कसले भय.
(दिपी)✒️
©दीपक पटेकर, सावंतवाडी
८४४६७४३१९६