You are currently viewing वेंगुर्ल्याच्या क्रॉफर्ड मार्केटचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते शानदार लोकार्पण

वेंगुर्ल्याच्या क्रॉफर्ड मार्केटचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते शानदार लोकार्पण

वेंगुर्ला नगर परिषदेच्या विकासात्मक कामांबद्दल गौरवोद्गार

वेंगुर्ला
वेंगुर्ला शहरातील ऐतिहासिक वास्तू असलेल्या व नूतनीकरण केलेल्या क्रॉफर्ड मार्केटचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते रविवारी फित कापून व फलकाचे अनावरण करून लोकार्पण करण्यात आले. यावेळी नारायण राणे यांनी वेंगुर्ला नगरपरिषदेने केलेल्या विकासात्मक कामांबद्दल गौरवोद्गार काढले.

वेंगुर्ले नगर परिषदेमध्ये आगमन होताच सर्वप्रथम नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे, सौ नीलम राणे, विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांचे पुष्पहार अर्पण करून व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई, तालुकाध्यक्ष तथा गटनेते सुहास गवंडळकर, नगरसेवक प्रशांत आपटे, धर्मराज कांबळी, नगरसेविका शितल आंगचेकर, साक्षी पेडणेकर, पूनम जाधव, श्रेया मयेकर, कृपा गिरप- मोंडकर यांच्यासहित भाजप पदाधिकारी उपस्थित होते.

वेंगुर्ले मध्ये सन १८७६ साली बांधण्यात आलेल्या या ब्रिटिश कालीन क्रॉफर्ड मार्केट मध्ये असणारे ४६ गाळे यांचे नूतनीकरण करण्यात आले आहे. तसेच बाहेरील सौंदर्य तसेच ठेऊन व या मूळ इमारतीला कोणताही धोका न लावता याचे नूतनीकरण करण्यात आले असून व्यापाऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे. नारायण राणे यांच्या हस्ते लोकार्पण झालेले हे मार्केट आता सर्वांसाठी खुले होणार आहे. वेळात वेळ काढून नारायण राणे यांनी नगरपालिकेला भेट दिल्याने नगराध्यक्ष दिलीप किरण यांनी त्यांचे आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा