नवलराज काळे यांच्या वाढदिवसानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे केले होते आयोजन
वैभववाडी
ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे कोकण प्रदेशाध्यक्ष नवलराज काळे यांच्या वाढदिवसानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. काळे यांची जन्मभूमी असलेल्या वैभववाडी तालुक्यात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या रक्तदान शिबिरामध्ये जिल्ह्यातून अनेक युवकांनी सहभाग घेतला. तालुक्यात याआधी तीन महिन्याच्या आत दोन रक्तदान शिबीर होऊन देखील, व लसीकरणाचे डोस चालू असल्याकारणामुळे रक्तदाते मिळवण्यासाठी अडथळा निर्माण होत होता परंतु या ठिकाणी तब्बल 17 जणांनी रक्तदान केले. या रक्तदान शिबिराचे आयोजन श्री माऊली चॅरिटेबल ट्रस्ट, सिंधू रक्त मित्र प्रतिष्ठान व ऑल इंडिया धनगर समाज महासंघ कोकण प्रदेश च्या वतीने करण्यात आले होते. तालुक्यात 18 वर्षावरील व्यक्तींचे लसीकरण मोठ्या प्रमाणात चालू असल्यामुळे अनेकजण रक्तदान करण्यासाठी आले होते परंतु ते रिजेक्ट झाले. या कार्यक्रमाला नवलराज काळे यांना आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात समाजबांधव, मित्रपरिवार उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या वेळी बोलत असताना महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि कोकणातील सर्व धनगर समाज काळे यांच्या नेतृत्वाखाली एकत्र करणार असल्याचे प्रतिपादन केले. संयमी एकनिष्ठता हुशार आणि समाजाला न्याय देण्यासाठी अहोरात्र काम पाहणारे, जागृत व सक्षम नेतृत्व म्हणजे नवलराज काळे आणि अशा व्यक्तीच्या नेतृत्वाखाली कोकणातील धनगर समाज एकत्र होऊ शकतो असा विश्वास व्यक्त करत ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्या वतीने कोकणामध्ये धनगर समाजाला न्याय देण्याचे काम करणार असल्याचे वक्तव्य देखील महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे यांनी केले. समाजाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी समाजातील बुद्धिजीवी वर्गाने युवा वर्गाने एकत्र येणे काळाची गरज आहे. त्यामुळे धनगर समाजाने एकतेचा नारा द्यावा ना प्रांतवाद, ना संघटना वाद,ना पोट जातीय वाद धनगर सारा एक हे ब्रीद वाक्य उराशी बाळगून 80 टक्के समाजकारण 20 टक्के राजकारण या या सूत्राने कोकणातील युवकांनी समाजकारणात कार्यरत व्हावे. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि ते गुरगुरल्याशिवाय राहत नाही. वाचनाने मस्तक सुधारते व सूधरलेले मस्तक कोणासमोर नतमस्तक होत नाही त्यामुळे शिक्षणाची गरज देखील समाजाला आहे यासाठी समाजातील गोरगरीब, दरी, खोऱ्यात राहणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी ऑल इंडिया धनगर समाज महासंघ प्रयत्नशील राहील. सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या वर्षी पासून शैक्षणिक साहित्य वाटप व आर्थिक अडचण व शिक्षणाची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांना दत्तक घेण्याचे कार्य प्रवीण काकडे यांच्या मार्फत चालू आहे. गेल्या वर्षी वैभववाडी तालुक्यातील पाच विद्यार्थ्यांना महासंघातर्फे व अहिल्याबाई शैक्षणिक व सामाजिक ट्रस्टतर्फे शैक्षणिक बाबतीत दत्तक देण्याची घोषणा केली होती. त्या घोषणेची अंमलबजावणी देखील या ठिकाणी करण्यात आली. या पाचही विद्यार्थ्यांना महासंघातर्फे व अहिल्याबाई शैक्षणिक व सामाजिक ट्रस्टतर्फे आर्थिक मदत देण्यात आली त्यांच्या रकमेचा धनादेश त्यांच्याकडे या कार्यक्रमाच्या निमित्ताने सुपूर्त करण्यात आला. या विद्यार्थ्यांमध्ये उंबर्डे गावचे अक्षय शेळके, व सडूरे तांबळघाटी येथील कै.श्री शिवाजी बाळकृष्ण बोडेकर यांचे दोन मुलगे व दोन मुली यांचा समावेश आहे.नवलराज काळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वैभववाडी तालुक्यातील आजी व माजी भारतीय सैनिकांचा सन्मान करण्यात आला. त्यात वैभववाडी तालुक्यातील भारतीय सैन्यदलात कार्यरत असणारे बाबू रामचंद्र गुरखे व वैभववाडी तालुक्यातील सडुरे गावचे माजी सैनिक संतोष सुभाष राणे यांचा या ठिकाणी सन्मानपत्र, शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारणी व जिल्ह्यातील आठही तालुक्यांची अध्यक्ष पदी नियुक्त झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. व सर्व पदाधिकाऱ्यांचा covid योद्धा म्हणून प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला त्यात वैभववाडीतील शकुंतला शेळके हिने यशवंतराव चव्हाण विद्यालय अचीर्णे मधून प्रथम क्रमांक पटकावला होता तिचा शाल श्रीफळ व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. तर वैभववाडी तालुक्यातील साहिल शेळके यांनी स्केटिंग स्पर्धेमध्ये क्रीडाक्षेत्रात सिल्वर मेडल मिळवून गिनिज बुक रेकॉर्ड मध्ये नोंद झाल्याबद्दल त्याचा महासंघातर्फे सत्कार करण्यात आला. कुडाळ मालवण या दोन्ही तालुक्यात तब्बल 165 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप देखील करण्यात आले व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. शैक्षणिक साहित्य वाटपामध्ये कुडाळ येथील गावराई धनगरवाडा, गोठोस धनगरवाडा मालवण येथील कुंभारमाठ धनगरवाडा, कातवड धनगरवाडा, देवली धनगरवाडा, असरोंडी धनगरवाडा व तळेवाडी येथील धनगरवस्तींचा समावेश आहे. या कार्यक्रम स्थळी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे साहेब, धनगर समाज नेते पत्रकार संजय शेळके,वैभववाडी तालुका धनगर समाज माजी अध्यक्ष सूर्यकांत बोडके, भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चा तालुका अध्यक्ष किशोर दळवी, युवा मोर्चा उपाध्यक्ष उदय पांचाळ, सिंधू रक्त मित्र प्रतिष्ठान वैभववाडी तालुका अध्यक्ष राजेश पडवळ, महासंघाचे कोकण प्रदेशाध्यक्ष तथा अध्यक्ष श्री माऊली चॅरिटेबल ट्रस्ट, व सिंधू रक्त मित्र प्रतिष्ठान चे जिल्हा कार्यकारणी सदस्य नवलराज काळे, कोकण प्रदेश संघटन मंत्री नितीन गावडे, सिंधुदुर्ग जिल्हा युवक अध्यक्ष अमोल जंगले,सिंधुदुर्ग जिल्हा विद्यार्थी आघाडी अध्यक्ष संदीप जंगले, जिल्हा उपाध्यक्ष नवनाथ झोरे, महासंघाचे जिल्हा सरचिटणीस श्री माऊली चॅरिटेबल ट्रस्ट चे सचिव ॲड. विक्रमसिंह काळे, मालवण कुडाळ विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष दिपक खरात, सिंधुदुर्ग जिल्हा प्रमुख संघटक निकेश झोरे, वैभववाडी तालुका युवा अध्यक्ष अनिल कोकरे, मालवण तालुका युवा आघाडी अध्यक्ष मंगेश झोरे, वैभववाडी तालुका अध्यक्ष दाजी बर्गे तालुका सल्लागार गंगाराम शिंदे, देवगड तालुका अध्यक्ष सुनील खरात. सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणी सदस्य जयेश शेळके, सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणी सदस्य दीपक झोरे, सिंधुदुर्ग जिल्हा मीडिया प्रमुख अनंत फोंडे,कुडाळ तालुका अध्यक्ष बापूसाहेब वरक,कुडाळ मालवण विधानसभा उपाध्यक्ष सोमनाथ झोरे, वैभववाडी तालुका युवा सरचिटणीस अक्षय शेळके, महासंघाचे वैभववाडी तालुका कार्याध्यक्ष स्वप्निल बावधने, तालुका सरचिटणीस चंद्रकांत बोडेकर विलास फाले, हेमंत फाले, रामचंद्र बावदाने, विजय आप्पाजी बोडेकर (सडुरे तांबळघाटी),जाऊ जंगले,श्री डोईफोडे, विठ्ठल शेळके, श्रीम.शुभांगी बोडेकर, प्रकाश शेळके, शकुंतला शेळके जलाल लांजेकर, जिलानी फरास इतर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.