नगराध्यक्ष संजू परब व अजय गोंदावळे यांच्या नेतृत्वात स्वागत
सावंतवाडी
केंद्रीय सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग मंत्री ना. नारायण राणे यांचे सावंतवाडी नगरीत धुमधडाक्यात व अभूतपूर्व असे स्वागत झाले. यावेळी त्यांच्यासोबत सौ. नीलम राणे, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी राज्यमंत्री तथा भाजपचे प्रदेश सरचिटणीस रविंद्र चव्हाण, माजी मंत्री तथा आ. आशिष शेलार, आ.कालिदास कोळंबकर, आ. प्रसाद लाड,भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, आ. शाम सावंत, भाजप प्रदेश सरचिटणीस तथा माजी खासदार नीलेश राणे, आ. नितेश राणे, यात्रा संयोजक प्रमुख माजी आ. प्रमोद जठार, अतुल काळसेकर, जि.प. उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर आदी उपस्थित होते.
सावंतवाडी शहरातील जनरल जगन्नाथराव भोसले उद्यानासमोर आयोजित कार्यक्रमस्थळी सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब व शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यांनी त्यांचे पुष्पहार अर्पण करून जल्लोषी स्वागत केले. यावेळी भाजपचे तालुका मंडल अध्यक्ष महेश धुरी, संदीप गावडे, महिला शहराध्यक्ष मोहिनी मडगावकर, युवा नेते विशाल परब, न. प. सभापती सुधीर आडिवरेकर, उदय नाईक, गटनेते राजू , नगरसेवक मनोज नाईक, आनंद नेवगी, नगरसेविका उत्कर्षा सासोलकर, दिपाली भालेकर, समृद्धी विरनोडकर, विशाल परब यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
आमदार नारायण राणे यांचे नियोजित वेळेनुसार रात्री ८ वाजता सावंतवाडी शहरात आगमन होणार होते मात्र तब्बल चार तास उशीर होऊनही भाजप कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांचे आगमन होताच ढोल ताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतषबाजीत त्यांचे धुमधडाक्यात स्वागत करण्यात आले. यावेळी भाजप पदार्थ कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. यावेळी शहर मंडल अध्यक्ष मोहिनी मडगावकर यांच्यासह नगरसेविकांनी त्यांची ओवाळणी केली. भारत माता की जय, ना. नारायण राणे यांचा विजय असो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विजय असो, नारायण राणे आगे बढो हम तुम्हारे साथ है, कोण आला रे कोण आला महाराष्ट्राचा सिंह आला अशा गगनभेदी घोषणांनी कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला.
कोलगावातही ना. नारायण राणेंचे जंगी स्वागत
केंद्रीय मंत्री ना. नारायण राणे यांचे कोलगांव येथे जंगी स्वागत करण्यात आले. भाजपचे जिल्हा चिटणीस महेश सारंग व सहकाऱ्यांनी त्यांचे भव्य स्वागत केले. यावेळी जोरदार घोषणाबाजी व फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. या वेळी भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.