जागतिक साकव्य विकास मंचचे सदस्य ज्ञानदेव सोसे यांची काव्यरचना
ती बँकेत आली तेव्हा सडपातळ होती शरिरा
चलन फुगवटा कधी झाला कळले ना मज पामरा
बँकेत आम्ही सर्वांनी पाळला सौजन्य आठवडा
तिच्या मधाळ बोलामुळे झाला चलनाचा तुटवडा
फिक्स डिपॉझिट मध्ये फिक्स करते का मला ?
व्याज दर कमी आहेत नंतर भेट बोलली मला.
हृदय लॉकर मध्ये सखये देशील का जागा मला?
वदली सोड अट्टाहास दोन चाव्या लागतात त्याला
तुझ्या सेविंग अकाउंटला सेव्ह कर बोललो तिला
बोलली करंटला दुसरा अकाउंट होल्डर आहे मुला
प्रेमपत्र लिहून हळूच पाठवले मी तिच्या इनवर्डला
कुणा सांगू बोलली तुला ठेवलेय मी सायडिंगला
आहे माझे प्रेम तुझ्यावरच बोललो मी हळूच तिला
बोलली सांग किती आहेत रे तुझ्या अकाउंटला
विचारले तिला मी होईल का चेक क्लीयर माझा ? दाखवून मंगळसूत्र वदली विसर रे माझ्या राजा
ज्ञानदेव सोसे
उप शाखा व्यवस्थापक
शामराव विठ्ठल को ऑप बँक नाशिक.
Nice 👍