मनसे लढवणार मालवण नगरपालिका
तोंडवली बंधाऱ्यासाठी निधी देण्याचे आश्वासन देऊनही अद्याप पत्र नाही;मनसे प्रदेश सरचिटणीस उपरकर यांचा आरोप
मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांची मालवणात पत्रकार परिषद
मालवण
येत्या नगरपालिका निवडणूकीत मनसे उतरणार असून सत्ताधार्यांनी शहरवासियांची शहर विकास आराखड्याबाबत जी फसवणूक केली आहे त्याचा पर्दाफाश मनसे करणार आहे. सत्ताधार्यांकडून शहराचा अपेक्षित विकास अद्यापही झालेला नाही. नागरपालिकेकडून शहराचा पर्यटन विकास रॉक गार्डनच्या पलीकडे गेलेला नाही. कोणतेही विकासाचे धोरण दिसून येत नाही. मनसेच्या माध्यमातून नाशिक शहराचा जसा विकास झाला तसाच विकास येथे मनसेकडून केला जाईल. यासाठी नगरपालिका निवडणुकीत शहरवासियांनी मनसेला साथ द्यावी असे आवाहनही परशुराम उपरकर यांनी यावेळी केले.
मालवण नगरपालिकेच्या शहर विकास आराखड्याचा मुद्दा घेऊन आराखडा बदलून घेऊन असे सांगत नगरपालिकेत सत्तेत आलेल्या शिवसेनेने आराखड्यात कोणताही बदल न करता मालवण शहरवासियांची फसवणूक केली आहे. मालवणच्या विकासाचे कोणतेही धोरण नगरपालिका सत्ताधाऱ्यांकडे नाही. म्हणूनच येत्या मालवण नगरपालिका निवडणुकीत मनसे उतरणार असून जनतेसमोर जावून मनसे शहर विकास आराखड्याच्या विषयाचा पर्दाफाश केल्याशिवाय राहणार नाही, जनतेने मनसेला साथ द्यावी, असे प्रतिपादन मनसेचे राज्य सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी मालवण येथे पत्रकार परिषदेत बोलताना केले. मालवण येथील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत परशुराम उपरकर बोलत होते. यावेळी श्री. उपरकर म्हणाले, मालवण नगरपालिकेच्या तत्कालीन नगर शहर विकास आराखडा बनविला होता. मालवण नगरपालिका ही ब्रिटीशकालीन असताना येथील परिस्थितीला अनुसरून आराखडा बनविला गेला नाही. हा शहर विकास आराखडा हा शहरवासियांच्या घरावर नांगर फिरविणारा होता. त्यामुळे या शहर विकास आराखड्याला जनतेने तीव्र विरोध दर्शविला. याच शहर विकास आराखड्याचा विषय घेत सध्याच्या सत्ताधार्यांनी जनतेला निवडणुकीवेळी सत्तेत आल्यावर येथील परिस्थितीनुसार शहर विकास आराखडा बदलला जाईल असे आश्वासन दिले होते. मात्र प्रत्यक्षात सत्तेत आल्यानंतर गेल्या काही वर्षात आरखड्यात बदल करण्याची कोणतीही कार्यवाही झालेली नाही, असेही उपरकर म्हणाले. मालवण शहर विकास आराखड्यावरील सुनावणी आयुक्त कार्यालयात घेण्याचे जेव्हा जाहीर झाले. त्याला भाजपच्या नगरसेवकांनी विरोध केला. मात्र शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींनी ही सुनावणी मालवणात घेण्यासाठी आवश्यक प्रयत्नच केले नसल्याचे दिसून आले. त्यामुळे या सत्ताधार्यांनी शहरवासियांची घोर फसवणूक केली असल्याची टीका उपरकर यांनी केली.