निसर्गसंपन्न सिंधुदुर्ग जिल्हा महाराष्ट्रातील शांत सुसंस्कृत सुशिक्षित लोकांचा जिल्हा. जिल्ह्यातील गुन्हेगारी पेक्षा जिल्हा नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सिंधुदुर्गात गुन्हेगारी खूपच कमी प्रमाणात आहे. गेले वर्षभर जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक पदावर राजेंद्र दाभाडे हे कार्यरत आहेत. पोलीस अधीक्षक पदाचा कारभार स्वीकारल्यानंतर राजेंद्र दाभाडे यांनी जिल्ह्याचे पोलीस प्रशासन उत्तमरीत्या सांभाळले असून कोरोनाचा काळ असतानाही जिल्हा रुग्णालयात स्वतः व्यक्तिशः तेथील व्यवस्था चोख राहण्यासाठी कार्यरत असायचे. आपल्या अधीक्षक काळात त्यांनी जिल्ह्यात उत्तम कायदा व सुव्यवस्था राखली आहे.
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी नसली तरी सर्वात जास्त प्रमाणात गोव्यातील करमुक्त दारूची चोरटी वाहतूक जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेर होत असते. यासाठी सरकारचा स्वतंत्र विभाग असला तरी जिल्ह्याच्या तपासणी नाक्यांवर बऱ्याच प्रमाणात चोरटी दारू पोलीस खात्याकडूनही पकडली जाते. जिल्ह्यात उघडकीस आलेले गांजा प्रकरण वगैरे मध्ये पोलिसांनी शिताफीने आरोपीना गजाआड केले. पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्या कार्यकाळात जिल्ह्यातील गुन्हेगारीला देखील आळा बसला आहे. जिल्ह्यात होणारे राजकीय राडे देखील आटोक्यात असून पोलीस अधीक्षक म्हणून त्यांनी जिल्ह्याची नाडी व्यवस्थित हाताळली आहे.
जिल्हा पोलिस प्रमुख म्हणून आपल्या कर्तव्यात कोणतीही कसूर न ठेवता उत्तमरीत्या प्रशासन सांभाळले असल्याने कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी म्हणून त्यांनी आपली प्रतिमा निर्माण केली आहे. *जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांना संवाद मिडियाकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..*