-भाजपा सोशल मीडियाचे अविनाश पराडकर यांची प्रतिक्रिया
राणे साहेबांच्या अटकेसाठी शिवसेनेचे मंत्री रत्नागिरी पोलीस अधीक्षक आणि अन्य पोलीस अधिकारी यांच्यावर टाकत असलेल्या दबावाची झलक नुकतीच महाराष्ट्राने पाहिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या खास वर्तुळातले असलेले परिवहन मंत्री अनिल परब पोलिसांना देत असलेल्या आदेशाची आणि नारायणराव राणेंना त्रास देण्यासाठी देत असलेल्या सूचनांची क्लिप संपूर्ण महाराष्ट्रात व्हायरल होत आहे. हा महाराष्ट्र आहे की राजकारणपिपासू तमिळनाडू हेच समजत नाही. अटकेसाठी शिवसेनेकडून चालवल्या गेलेल्या दबावतंत्राचा पर्दापाश झाला असून न्यायव्यवस्था याची दखल नक्कीच घेईल. यापूर्वीही खंडणीखोर पोलीस अधिकाऱ्यांना भाडोत्री गुंडांसारखे वापरत अर्णब गोस्वामी या पत्रकाराला दिलेला त्रास शिवसेना नेत्यांच्या अंगाशी आला होता. पण यातून बोध न घेता शिवसेना एकाच दगडावर पुन्हा पुन्हा आपटत आहे, कारण ती स्वार्थाने अंध झाली आहे. भाजपाला रोखण्यासाठी अशा षडयंत्राचा काडीमात्र उपयोग होणार नाही. सत्य परेशान होते पण पराजित नाही, हे लवकरच शिवसेनेला पुन्हा एकदा कळून चुकेल. पण सुधारायची संधी मात्र आता मिळणे कठीण आहे. असल्या तालिबानी विचारसरणीच्या राजवटीत सामान्य माणसांचे जगणे किती हालाचे होईल याचा विचार करून आता तातडीने राष्ट्रपती राजवट महाराष्ट्रात लावण्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे, असे मत भाजपा सोशल मीडिया सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रदेश सदस्य अविनाश पराडकर यांनी व्यक्त केले आहे.