नारायणराव राणे हे वादळ आहे. त्यांना रोखण्याची भाषा करणारे आहेत तिथेच राहिलेत. त्यांची उंची गाठण्याची लायकी नसलेली कुत्री आज सत्तेच्या जीवावर त्यांच्यावर तोंड करून भुकायला लागली आहेत. पण सिंहाची वाट अडवायची हिंमत अशी कुत्री करू शकत नाहीत हे मुंबईपासून दिसून आले आहे, हे आधी उघड्या डोळ्यांनी बघा आणि खात्री करून घ्या. सिंधुदुर्ग जिल्हातील यात्रा फक्त जिल्हाच नव्हे तर महाराष्ट्रासह देशही विसरणार नाही अशी न भूतो न भविष्यती अशीच निघणार. इथल्या जल्लोषाचा नाद करायचा नाही. पदराआड लपून बसणाऱ्यांच्या तोंडात राणेंना अडवण्याची भाषा शोभत नाही. हिम्मत असेल तर यात्रा रोखण्यासाठी पोलीस बंदोबस्त न घेता समोर या, भाजपा पदाधिकारी बाजूलाच, आम्ही फ़क्त युवा मोर्चावालेच तुम्हाला पुरून उरु. उगाच वायफळ न बडबडता हातून जे होईल आणि राजकीय तब्येतीला झेपेल इतकीच वल्गना करावी असा सल्ला तुम्हाला देतोय.
“कामे वाटप कार्यक्रमा”तून पैसे उकळण्याचे पराक्रम समोर आल्याने झालेली बदनामी लपवण्यासाठी अशी पोकळ विधाने करत असाल हे आम्ही समजतो. पण त्यासाठी एवढे पण भूमिकेत शिरू नका. हिंमत असेल तर सिंधुदुर्गात यात्रा रोखून दाखवाच, असे खुले आव्हान भाजयुमो तालुकाध्यक्ष रुपेश कानडे यांनी दिले आहे.