शिवसैनिकांकडून राणे यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी…
कणकवली
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत कणकवली शिवसेना कार्यकर्त्यांनी नारायण राणे यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करत पुतळा हिसकावून घेतला. यात पोलिस व शिवसैनिकांमध्ये जोरदार झटपट झाली. शिवसैनिकांनी देखील पोलिसांची बाचाबाची करत असताना अखेर पोलिसांनी नारायण राणे यांचा प्रतीकात्मक पुतळा हिसकावून घेतला. त्यानंतर शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला.
शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी श्रीधर नाईक चौकांमध्ये नारायण राणे यांच्या प्रतिकृती पुतळ्याचे दहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र मोठ्या प्रमाणात जमलेल्या पोलीस पथकाने हा प्रयत्न हाणून पाडला. राणे यांच्या वक्तव्यामुळे राज्यातील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये तणावाचे वातावरण आहे. विशेष म्हणजे राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या कणकवली शहरांमध्ये याची ठिणगी पडण्याची शक्यता होती. या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिसांनी दंगल बाबू पथकास दोन पोलिस पथके आज सकाळपासून तैनात ठेवली होती. जसे वातावरण माध्यमातून तापत होते तर तसेच शिवसेनेचे कार्यकर्ते कणकवलीच्या विभागीय शिवसेना शाखे मध्ये जमा होते.
आज सकाळी अकरा वाजेपर्यंत जमलेल्या कार्यकर्त्यांमध्ये पुढची रणनीती सुरू झाली होती. दुपारी बाराच्या सुमारास नरडवे नाक्यावर जमलेल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला. यामध्ये नगरसेवक सुशांत नाईक नगरसेवक कन्हैया पारकर शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजू शेेट्टी ,युवा सेना प्रमुख ॲड. शैलेश गावडे महिला आघाडी प्रमुख नीलम पालव, जि प सदस्य स्वरूपा वीखाळे अजय सावंत, संतोष परब, बंडू ठाकूर, रमेश चव्हाण, सुजित जाधव, शिवसेना तालुका आदी सह 20 ते 25 शिवसेना कार्यकर्त्यांचा समावेश होता. मुख्य चौकांमध्ये महामार्गाच्या खाली पुतळा जाळण्यासाठी अचानकपणे झालेल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांची धांदल उडाली. मात्र त्यात परिसरामध्ये दोन पोलिसांच्या गाड्या कुठे होत्या, घोषणाबाजी देता देता पुतळा जाळण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला .