You are currently viewing कणकवली पं.स.चा शिक्षण विभागाचा छपराचा भाग कोसळला

कणकवली पं.स.चा शिक्षण विभागाचा छपराचा भाग कोसळला

कणकवली

कणकवली पंचायत समितीतील नवीन इमारत उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असतानाच सद्यस्थितीत ज्या इमारतीतून कणकवली पंचायत समितीचा शिक्षण विभागाचा कारभार चालतो.  त्या शाळेच्या छपराचा काही भाग काल दुपारी सुट्टीच्या दिवशी कोसळला. त्यामुळे सुदैवाने कोणास इजा झाली नाही. मात्र गटशिक्षण अधिकारी यांचे केबिन या यामुळे उघड्यावर आले आहे.

कणकवली पंचायत समिती शिक्षण विभाग, कृषी विभाग, अंगणवाडी व डीआरडीए विभाग हा कणकवली पंचायत समितीच्या बाजूलाच शाळेमध्ये गेल्या काही वर्षापासून सुरू आहे. ही इमारत जीर्ण झाली असून शाळेचे छप्परही वाळवी लागल्याने कमकुवत बनले आहे. यावर्षी पावसाचा जोर जास्त असल्याने त्यातच इमारतीचे छप्पर कमकुवत झाल्याने काल मोहरमच्या सुट्टीदिवशी या छपराचा काही भाग थेट गटशिक्षणाधिकारी बसतात तेथेच कोसळला.

कर्मधर्मसंयोगाने काल शासकीय सुट्टी असल्याने कार्यालयात कुणीच नव्हते. त्यामुळे कुणालाही दुखापत झाली नाही. मात्र छप्पर कोसळल्याने काही प्रमाणात केबिनचे नुकसान झाले असून इमारतीत पावसाचे पाणी येत होते. सुदैवाने मोहरमची सुट्टी असल्याने बाका प्रसंग टळला असला तरी पंचायत समिती कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे नवीन इमारतीचे उद्घाटन व्हावे आणि त्यात सर्व विभाग स्थलांतरित करावे अशी मागणी कर्मचाऱ्यांमध्ये होत आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा