कुडाळ तालुक्यात विविध ठिकाणी कंटेन्मेंट झोन
सिंधुदुर्गनगरी :-
कुडाळ तालुक्यातील मौजे ओरोस, सावंतवाडा, बिल्डींग Q तळमजला, रुम नं. 103 दिनांक 26 सप्टेंबर 2020 पर्यंत, मौजे गोठोस, दाडसकलवाडी, घर नं. 508 च्या 50 मीटर परिघामध्ये दिनांक 27 सटेंबर 2020 पर्यंत, घावनळे- खोचरेवाडी च्या 50 मीटर परिघामध्ये दिनांक 28 सप्टेंबर पर्यंत, मौजे रानबांबुळी, परबवाडी, घर नं. 208 आणि 829, सिमरेवाडी, घर नं. 584, ओरोस ,बोरभाटवाडी, घर नं. 1296, नवनगर विकास प्राधिकरण, A 73, खर्येवाडी, घर नं. 1444ए/3, मौजे कसाल, कुंभारवाडी, घर नं. 1170 च्या 50 मीटर परिघारमध्ये, मौजे झाराप, घाडीवाडी, घर नं. 720 च्या 50 मीटर परिघारमध्ये, मौजे केरवडे तर्फ माणगाव, (भोयाचे केरवडे) बोर्डेवाडीच्या 50 मीटर परिघारमध्ये, मौजे नानेली, नार्वेकरवाडी, घर नं. 369 च्या 50 मीटर परिघारमध्ये, दिनांक 29 सप्टेंबर 2020 पर्यंत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे.
सदर कंटेन्मेंट झोनमध्ये संबंधित दिनांकपर्यंत,सर्व आस्थापना, दुकाने, वस्तूविक्री बंद राहणार आहेत. तसेच या क्षेत्रामध्ये नागरिकांना येणे – जाणे व सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद असेल. हे आदेश अत्यावश्यक सेवा, सार्वजनिक वितरण व्यवस्था, वैद्यकिय उपचार व्यवस्था, बँक, सेवा देणारे अधिकारी, कर्मचारी व त्यांची वाहने यांना लागू राहणार नाही. तसेच सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्याविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 कलम 51 व 58 अन्वये तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनयम, 1951 चे कलम 71,139 तसेच भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, असे आदेश कुडाळच्या उपविभागीय अधिकारी वंदना खरमाळे यांनी दिले आहेत.