– आरोग्यमंत्री राजेश टोपे
पुणे:
शाळा आणि कॉलेज सुरू करण्यासंदर्भात 5 ते 6 दिवसात निर्णय घेतला जाईल, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. राज्यात आणि देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका असताना मंदिर उघडण्याची घाई नको.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंदिंर सुरु करण्यासंदर्भात निर्णय घेतील, असं राजेश टोपे म्हणाले.
शाळा आणि कॉलेज सुरु करण्यासंदर्भात 5 ते 6 दिवसांमध्ये निर्णय घेण्यात येईल. उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा झाली आहे. उच्च व तंत्रशिक्षण विभाग कुलगुरुंच्या संपर्कात आहे. कुलगुरु त्यांच्या कार्यक्षेत्रातील महाविद्यालय सुरु करण्यासंदर्भातील अहवाल शिक्षण संचालक कार्यालयाकडे पाठवतील. साधारणपणे येत्या पाच ते सहा दिवसात निर्णय होईल. शालेय शिक्षण विभाग आणि टास्क फोर्स यांची चर्चा होऊन शाळा सुरु करण्यासंदर्भातील निर्णय घेतला जाईल, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.
कोरोनाची तिसरी लाट असल्यानं मंदिर उघडण्याची घाई नको
कोरोनाची तिसरी लाट उंबरठ्यावर असतांना मंदिरं सुरू करण्याची घाई नको. आपण वेट आणि वॉच करत आहोत याबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.