सिंधुदुर्गनगरी
जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात मालवण तालुक्यात सर्वाधिक 33 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 17.7 मि.मी. पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 3007.4375 मि.मी. पाऊस झाला आहे.
तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग-21(2952), सावंतवाडी-14(3310.1), वेंगुर्ला-16.6(2409.4), कुडाळ-11(2924), मालवण-33(3198), कणकवली-18(3296), देवगड-11(2609), वैभववाडी-17(3361) असा पाऊस झाला आहे.