You are currently viewing शिरोडा-वेळागर येथे अजस्त्र लाटांमुळे किनाऱ्याची धूप….

शिरोडा-वेळागर येथे अजस्त्र लाटांमुळे किनाऱ्याची धूप….

प्रतिबंधक बंधाऱ्यांची दैनावस्था; बागायती पाणी घुसल्यामुळे मोठे नुकसान…

वेंगुर्ले

तालुक्यातील शिरोडा वेळागरला सध्या समुद्राच्या अजस्त्र लाटांचा मोठा तडाका बसत असून किनाऱ्याची धूप मोठ्या प्रमाणात होत आहे. सुरक्षेसाठी बांधलेल्या एक किलोमीटर लांबीच्या धूप प्रतिबंधक बंधाऱ्याची दैनावस्था झाली आहे. बंधाऱ्याचे दगड व जाळी फाटून वाहून गेली. तसेच समुद्राचे खारे पाणी आता माड बागायतीमध्ये घुसून नुकसान होत आहे. तरी शासनाने वेळीच लक्ष द्यावे व पुढे होणारी मोठी हानी टाळावी अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
शिरोडा वेळागर येथे १० वर्षा पूर्वी सर्व्हे नंबर ३९ या भागात समुद्राच्या उधाणाचे पाणी घुसून नुकसान झाले होते. बागायती मध्ये पाणी घुसून किनाऱ्यावर झाडे उन्मळून पडून वाहून गेली होती. मात्र शासनाने त्यावेळी एक रुपयाची नुकसान भरपाई दिली नाही. मात्र वेळागर वासीयानी एकजुट करीत आवाज उठवला होता म्हणून तेथे शासनाला धूप प्रतिबंधक बंधाऱ्याचा प्रस्ताव सुमारे तीन ते साडेतीन कोटी रुपये मंजूर करावा लागला. एक किलोमीटर लांबीचा हा बंधारा मंजूर करून तो बांधण्यात आला. मात्र बंधाऱ्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने गेल्या चार – पाच वर्षांपासून बंधाऱ्याचे दगड बाहेर पडणे, तारा तुटून जाणे असे प्रकार सुरू आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा