You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रमुख ३ रस्त्यांच्या दर्जोन्नतीबाबत प्रस्ताव मागविले

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रमुख ३ रस्त्यांच्या दर्जोन्नतीबाबत प्रस्ताव मागविले

आ. वैभव नाईक यांच्या मागणीची सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी घेतली दखल

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इतर जिल्हा मार्ग म्हणून नमूद केलेले प्रमुख ३ रस्ते जिल्ह्यांतर्गत अत्यंत महत्वाचे असल्याने सदर रस्त्यांना प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून दर्जोन्नती देण्याची मागणी कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे निवदेनाद्वारे केली आहे.
यामध्ये आडेली-झाराप-साळगाव-माणगाव इजिमा ५३, आवळेगाव- हिर्लोक-निवजे-आंबेरी इजिमा ४६, शिरवल-कुपवडे इजिमा २७ या तीन रस्त्यांना प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून दर्जोन्नती देण्याची मागणी आ. वैभव नाईक यांनी केली आहे. त्यानुसार मंत्रालयातील सार्वजनिक बांधकाम विभागाने सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता (प्रादेशिक विभाग कोकण) याच्याशी पत्रव्यवहार करून आ. वैभव नाईक यांच्या पत्राच्या अनुषंगाने योग्य तो प्रस्ताव शासनास तात्काळ सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा