You are currently viewing वनक्षेत्रात वृक्षतोड; दोघांना अटक

वनक्षेत्रात वृक्षतोड; दोघांना अटक

कुडाळ :

माणगाव – भटवाडी येथे शासकीय राखीव वनक्षेत्रातील सागांची तोड केल्याप्रकरणी माणगाव भटवाडी ते दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाईदरम्यान दोघेही संशयित पळून जाण्याच्या प्रयत्नात असतानाच वनविभागाच्या कर्मचारयांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना पकडण्यात यश मिळवले.कारवाई कुडाळ वन विभागाने ९ ऑगस्ट रोजी केली असल्याची माहिती वनक्षेत्रपाल अमृत शिंदे यांनी दिली.

कुडाळ वनविभागाला माणगाव भटवाडी येथील शासकीय वनक्षेत्राचा झाडांची तोड होत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार वनरक्षक माणगाव यांनी मौजे माणगाव भटवाडीचे शासकीय राखीव वन कक्ष क्रमांक 117 व 118 मध्ये जाऊन पाहणी केली असता दत्ताराम विठ्ठल हळदणकर व प्रवीण आत्माराम सावंत दोघे ( रा. भटवाडी ता- कुडाळ ) हे समोर येताना दिसून आले. श्री हळदणकर यांच्या हातात कुऱ्हाड व श्री. सावंत यांच्या खांद्यावर लाकूड नग असलेला दिसून आला. वनरक्षक यांनी त्यांना अटकाव करण्याचा प्रयत्न केला असता दोघेही पळून जात असताना पाठलाग करून त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर दत्ताराम विठ्ठल हळदणकर व प्रवीण आत्माराम सावंत यांना चौकशी कामे ताब्यात घेऊन रेंज कार्यालय कुडाळ येथे आणले. अधिक चौकशीअंती त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करून या दोघांनाही अटक करण्यात आली. त्यांच्याकडून घटनास्थळावरून तोड केलेल्या साग प्रजातीचे झाडाचे बुढ एक व त्यापासून तयार केलेले साग गोल नग 2 तसेच सदर गुन्ह्यात वापरलेले कुऱ्हाड व हात कर्वत मौजे माणगाव भटवाडी च्या शासकीय राखी वनरक्षक क्रमांक 117 व 118 येथून जप्त करण्यात आले. दोघांनाही कुडाळ न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. कारवाई उपवनसंरक्षक शहाजी नारनवर सहाय्यक वनरक्षक आय.डी जलगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी कुडाळ अमृत शिंदे वनपाल माणगाव धु.रा.कोळेकर, वनरक्षक बा.म. जगताप. सा.स .कांबळे, स.कै.कांबळे, सु.म.सावंत . वनमजूर श्री. आगलावे, श्री.कदम ,श्री. कविटकर,श्री.सावंत यांनी केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा