राजकीय वरदहस्त कुणाचा?
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली हे जुगाराचे केंद्रबिंदू म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. जिल्ह्यातील फक्त कणकवलीत धुमधडाक्यात अंदरबाहर जुगार सुरू आहे. त्यामुळे कणकवलीची आणखी एक ओळख पुढे येऊ लागली आहे. त्यामुळे कणकवलीत सुरू असलेल्या या जुगाराला राजकीय वरदहस्त कोणाचा आहे? आणि कोण मंत्र्यांच्या एवढे जवळ आहेत? अशी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इतर गॅम्बलर मात्र चर्चा करत आहेत. आम्हाला जुगाराची बैठक बसवायला दिली जात नाही, मात्र कणकवलीत खुले आम बैठका होतात. असे प्रश्नही विचारू लागले आहेत.
कणकवलीत मुडेडोंगरी टाकी नाजिक रात्री ९.३० वाजता बैठक बसते. सोशल मीडियावर बातमी आली की कणकवलीत जागा बदलून जुगाराच्या मैफिली झडतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यात क्लब बंद आहेत मात्र कणकवलीत सुरू आहेत. कणकवलीत होत असलेली ही मेहेरनजर कोणाच्या आशीर्वादाने? सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रसन्ना नावाचे पोलीस अधीक्षक होते त्यावेळी धर्मादाय आयुक्त यांच्या परवान्यावर जिल्ह्यात सुरू असणाऱ्या क्लब वर देखील धाड पडत होती, सामान जप्त केले जात होते. परंतु आज धर्मादाय आयुक्तांच्या परवानगीने सुरू असणाऱ्या क्लब मध्ये राजरोसपणे जुगार सुरू आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जुगाराचे शौकीन जुगारी कणकवलीत क्लब मध्ये जातात. जिल्ह्यातील इतर ठिकाणचे क्लब बंद आहेत, त्यामुळे कणकवलीत क्लब मध्ये जुगाऱ्यांची जत्रा भरते.
कणकवलीत जुगाराचा बादशाह टिंगल मोंतेरो आपला जुगाराचा अड्डा सोशल क्लब मध्ये भरवतो. जागा बदलून हे अंदरबाहर जुगार कधी कणकवलीत शेत मांगरात, कधी बेळणे येथील घरात, साकेरी बागेत असे आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने जसे मैदान बदलून भरवले जातात तसेच आज इथे तर उद्या तिथे असे बसतात. त्यामुळे अगदी निर्धास्तपणे जुगार कणकवलीत सुरू असल्याचे चित्र समोर येत आहे.
जिल्ह्यात सुरू असलेल्या, राजकीय वरदहस्त लाभलेल्या जुगार अड्डयांवर जिल्हा पोलिस अधीक्षक आळ आणणार आहेत की जिल्हा चरस, गांजा, दारू सारख्या नावाने बदनाम होतोच आहे तसा भविष्यात जुगाराच्या नावाने देखील बदनाम होणार आहे?