You are currently viewing खंडित विद्युत सेवेबद्दल उपअभियंत्यांना घेराव घालणार- गणपत डांगी यांचा इशारा

खंडित विद्युत सेवेबद्दल उपअभियंत्यांना घेराव घालणार- गणपत डांगी यांचा इशारा

दोडामार्ग

साटेली भेडशी गावात मागील काही दिवस विद्युत सेवा वारंवार खंडित होत आहे.रात्री अपरात्री विद्युत प्रवाह खंडित करणे.खंडित विद्युत प्रवाह तासनतास सुरळीत न करणे तर रोज त्या ठराविक वेळेलाच विद्युत खंडित करणे यामुळे ग्रामस्थ ,व्यापारी बांधव त्रस्त झाले असून वीज वितरणाच्या या कारभाराबद्दल तीव्र संताप व्यक्त करीत आहे.काही महिन्यांवर गणेश चतुर्थी सण आल्याने या प्राश्वभूमीवर नागरिकांची विविध घरगुती कामे सुरू आहेत तर व्यापारी बांधवांना सुध्दा नियमित अखंडित विद्युत सेवा मिळणे गरजेचे आहे मात्र साटेली भेडशीतच मागील काही दिवस विद्युत सेवा वारंवार खंडित होत असल्याने मोठी गैरसोय होते.रात्री अपरात्री विद्युत प्रवाह खंडित करणे.खंडित विद्युत प्रवाह तासनतास सुरळीत न करणे यामुळे ग्रामस्थ ,व्यापारी बांधव त्रस्त झाले आहे या त्रासाबद्दल ग्रामस्थ , व्यापारी बांधव यांना सोबत घेऊन दोडामार्ग विभागीय कार्यालय अभियंता ,साटेली भेडशी शाखा कार्यालय उपअभियंता यांना जाब विचारण्यासाठी बुधवारी घेराव घालण्यात येईल असा इशारा उपसरपंच गणपत डांगी यांनी दिला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा