सिंधुदुर्गनगरी
महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण विभाग यांच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२१-२२ करिता होणाऱ्या पॉलिटेक्निक प्रवेश प्रक्रियेसाठी शासकीय तंत्रनिकेतन मालवण येथे प्रथम वर्ष डिप्लोमा तसेच थेट व्दितीय वर्ष डिप्लोमा, या अभ्यासक्रमांसाठी सुविधा केंद्र Facilitation Center सुरु आहे. विद्यार्थ्याने प्रवेश अर्ज ऑनलाईन भरायचा आहे.प्रथम वर्ष डिप्लोमासाठी प्रवेश अर्ज करण्याची अंतिम मुदत १३ ऑगस्ट 2021 तर डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमासाठी अंतिम मुदत ११ ऑगस्ट 2021 पर्यत वाढविण्यात आल्याचे शासकिय तंत्रनिकेतनचे प्राचार्य यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.
प्रसिध्दी पत्रकाव्दारे म्हटले आहे. ऑनलाइनपद्धती मध्ये E-Scrutiny व Physical E-Scrutiny असे दोन पर्याय आहेत. कोविड-१९ च्या प्रादुर्भाव थांबवण्यासाठीच्या उपाययोजना मध्ये सामाजिक अंतर राखणे, विद्यार्थी व पालकांची होणारी गर्दी टाळणे या साठी E-SCRUTINY या पर्यायचा निवड करणे अशी सर्व विद्यार्थी व पालकांना विनंती करण्यात येत आहे. Physical Scrutiny या पर्याय मध्ये विद्यार्थ्यांना ऑनलाइन फॉर्म भरून ,प्रिंट घेऊन सुविधा केंद्रावर प्रत्यक्ष उपस्थित राहून निश्चित करणे आवश्यक आहे. फॉर्म भरण्यासाठी मोबाईल नंबर असणे गरजेचे आहे. प्रवेश अर्जासोबत शाळा सोडल्याच्या दाखल्या ऐवजी जन्म प्रमाणपत्र सादर करता येणार आहे.
शासकीय तंत्रनिकेतन मालवण संस्थेमध्ये एकूण ३२० विद्यार्थ्यांच्या प्रवेश क्षमतेसह स्थापत्य (Civil) अभियांत्रिकी,प्रवेश क्षमता -६०, संगणक (Computer) अभियांत्रिकी प्रवेश क्षमता -६०, विद्युत (Electrical) अभियांत्रिकी प्रवेश क्षमता -६०, अणुविद्युत (Electronics & Communication) अभियांत्रिकी प्रवेश क्षमता -६० , यंत्र (Mechanical) अभियांत्रिकी प्रवेश क्षमता -६०, व अन्न तंत्रज्ञान Food Technology प्रवेश क्षमता -२०, या पदविका अभ्यासक्रमाच्या शाखा कार्यान्वित आहेत.
जास्तीत जास्त विद्यार्थ्यानी प्रवेश प्रक्रियेसाठी विहित मुदतीत प्रवेश अर्ज सुविधा केंद्र FC व निश्चिती केंद्र ARC यांचा लाभ घेण्यात यावा असे आवाहन संस्थेचे प्राचार्य डॉ.सुरेश पाटील यांनी केले आहे. अधिक महितीसाठी www.gpmalvan.co.in या संकेतस्थळावर तसेच प्रा.डी.एन.गोलतकर- 9764513133, डॉ. वाय.व्ही.महाडीक-9423682846, प्रा.संदेश जोशी- 9422641384 यांच्याशी संपर्क साधावा .