You are currently viewing ५८ महाराष्ट्र बटालियन एन.सी.सी. सिंधुदुर्ग आयोजित परीक्षेत अर्जुन रावराणे विद्यालयाचे उज्वल यश

५८ महाराष्ट्र बटालियन एन.सी.सी. सिंधुदुर्ग आयोजित परीक्षेत अर्जुन रावराणे विद्यालयाचे उज्वल यश

वैभववाडी

५८ महाराष्ट्र बटालियन एन.सी.सी. सिंधुदुर्ग यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या परीक्षेत वैभववाडी येथील अर्जुन रावराणे विद्यालयातील विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन केले आहे.सदर परीक्षेत‌ प्रशालेचे एकूण तेवीस विद्यार्थी प्रविष्ट झाले होते.


या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरणाच्या कार्यक्रम‌ वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे स्थानिक अध्यक्ष तथा अधिक्षक जयेंद्र रावराणे यांच्या हस्ते प्रशालेत संपन्न झाला. सर्व एन.सी.सी. कॅडेट्स यांना प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. एन.सी.सी. छात्र हा एक फौजीच असतो असे मत यावेळी अधिक्षक जयेंद्र रावराणे यांनी व्यक्त केले. या परीक्षेतील हे प्रमाणपत्र आपणास भावी आयुष्यात खूप उपयोगी पडेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. N.C.C. (नॅशनल कॅडेट कोर )मुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो समाजसेवा, अनुशासन ,चारित्रनिर्माण,व परिश्रम अशा सवयीमुळे त्या कॅडेटचे चांगले व्यक्तिमत्व निर्माण होते असे सी.टी.ओ. तुळसणकर एस टी यांनी सांगितले.
यावेळी संस्था अधिक्षक जयेंद्र रावराणे, प्रशालेचे मुख्याध्यापक श्री नादकर बी एस ज्येष्ठ शिक्षक शिंदे सर, पाटील पी. एम.पवार पी.बी.,चोरगे एम. एस,केळकर ए.जी., सावंत पी.पी., पाटील एस.एस,भोसले एस.व्ही, सबनिस एस.ए. व इतर शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी तसेच एनसीसी कॅडेट्स व विद्यार्थी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा