पंचाक्षरी काव्य
श्रावणसरी
हर्ष मानसी
ऊन पाऊस
खेळ नभासी
पाना फुलांत
दिसती मोती
पाहूनी नेत्र
भिरभिरती
इंद्रधनू तो
मन भूलवी
अवकाशी हा
रंग फूलवी
झरझर हा
वाहे निर्झर
डोंगरालाही
फुटे पाझर
बहरलेला
माळ सुंदर
पाणीयात हा
हसे अंबर
वाऱ्यावरती
शिवार डोले
फुलपाखरू
कानात बोले
आला श्रावण
उन्हात धारा
नाचे मयूर
फुले पिसारा.
©{दिपी}
दीपक पटेकर, सावंतवाडी
८४४६७४३१९६