You are currently viewing शिक्षक भारतीचे ९ रोजी राज्यव्यापी ‘धरणे आंदोलन’ सिंधुदुर्गात सुद्धा होणार..

शिक्षक भारतीचे ९ रोजी राज्यव्यापी ‘धरणे आंदोलन’ सिंधुदुर्गात सुद्धा होणार..

जिल्हा अध्यक्ष संजय वेतुरेकर यांची माहिती

तळेरे:- प्रतिनिधी

ऑगस्ट क्रांती दिनाच्या दिवशी ९ ऑगस्ट रोजी देशभरातील शेतकरी संघटना, कामगार संघटना, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील विविध शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना एकदिवशीय देशव्यापी आंदोलन करणार आहेत. शिक्षण बचाव मंच अंतर्गत झालेल्या विविध संघटनाच्या बैठकीत दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा, सर्वांना जुनी पेन्शन योजना, विद्यार्थी, शिक्षक व जनता विरोधी नवे शैक्षणिक धोरण रद्द करा, विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणासाठी प्रति विद्यार्थी २००० रुपये नेटपॅक भत्ता आणि मोफत मोबाईल अथवा टॅब द्या, अनुसूचित जाती – जमाती व गरीब विद्यार्थ्यांसाठी विशेष आर्थिक शैक्षणिक पॅकेज घोषित करा , तसेच राज्यस्तरीय व . जिल्हास्तरीय प्रलंबित मागण्यांसाठी देशव्यापी आंदोलन होणार आहे. या आंदोलांनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात होणाऱ्या आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय शिक्षक भारतीने घेतला आहे.

सोमवार दिनांक 9 ऑगस्ट 2021 रोजी शिक्षक भारती सिंधुदुर्ग संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदे समोर दुपारी २ ते ४ या वेळेत कोविडचे सर्व निर्देश व नियम यांचे काटेकोर पालन करून एकदिवशीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती शिक्षक भारती जिल्हाध्यक्ष संजय वेतुरेकर आणि सचिव सुरेश चौकेकर यांनी दिली आहे.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा