दोडामार्ग
कॅन्सर, किडनी व हृदयरोग अशा दुर्धर आजाराने पीडित असलेल्या रुग्णांना जिल्हा परिषद फंडातून १५ हजार रुपयांची आर्थिक मदत मिळणार असून त्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज अशा रुग्णांनी किंवा त्यांच्या नातेवाईकांनी द्यावेत असे आवाहन शिक्षण व आरोग्य सभापती डॉ.सौ.अनिशा दळवी यांनी केलं आहे.
जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कॅन्सर, किडनी व हृदयरोग अशा आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांना उपचारासाठी १५ हजार रुपयांची तत्काळ मदत दिली जाणार आहे.जिल्हा परिषदेच्या आर्थिक फंडातून हा लाभ मिळणार आहे.याचा लाभ हयात असलेल्या आणि मयत झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना घेता येणार आहे.
या आर्थिक फंडाचा लाभ घेण्यासाठी संबंधित अर्जदाराने विहित नमुन्यात अर्ज करावयाचा आहे.यासाठी रुग्ण ग्रामीण भागातील असल्याचा रहिवाशी असल्याचा सरपंच यांचा दाखल,प्रस्तावासोबर रेशनकार्डची सत्यप्रत, अल्प भूधारक असल्यास गटविकास अधिकारी यांचा दाखला,दुर्धर आजाराने त्रस्त असल्याबाबत प्राधिकृत वैद्यकीय अधिकारी किंवा जिल्हा शल्य चिकित्सक यांचे प्रमाणपत्र, औषध-उपचारांची यादी,रुग्ण हयात नसल्यास रुग्णाच्या मृत्यूचा दाखला,आधारकार्ड, बँक पासबुक झेरॉक्स ही कागदपत्रे आवश्यक आहेत.
या संबंधीतील विहित नमुन्यातील अर्ज उपलब्ध असून यासाठी यानुसार प्रस्ताव सादर करावेत असे आवाहन डॉ.सौ.दळवी यांनी करत अधिक माहितीसाठी प्रवीण गवस भाजप तालुकाध्यक्ष 91 94059 29487 किंवा जय भोसले 9370921793 वर संपर्क साधावा.