You are currently viewing विलवडे येथे शिवसेनेच्यावतीने जीवनावश्यक वस्तुंचे वाटप…

विलवडे येथे शिवसेनेच्यावतीने जीवनावश्यक वस्तुंचे वाटप…

बांदा

शिवसेना आमदार तथा माजी पालकमंत्री दिपक केसरकर यांच्यावतीने विलवडे गावांतील ६० पुरग्रस्त कुटुंबांना जीवनावश्यक वस्तुंचे वाटप करण्यात आले.

अतिवृष्टीमुळे विलवडे गावांतील काही भागामध्ये नदीचा प्रवाह जावून तेथील शेतक-यांच्या घरांचे व पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. शिवसेनेच्यावतीने विलवडे गावांतील ६० पुरग्रस्त कुटुंबांना जीवनावश्यक वस्तुंचे वाटप माजी उपसभापती विनायक दळवी, शिवसेना उपजिल्हा प्रमुख अशोक दळवी, सजंय गांधी निराधार समिती सदस्य गजानन नाटेकर यांच्या उपस्थितीत जिवनावश्यक वस्तुंचे वाटप करण्यात आले.
यावेळी विलवडे सरपंच रावजी दळवी, विभागप्रमुख आनंद दळवी, उपविभागप्रमुख महंता गवस, सामाजिक कार्यकर्ते सोनू दळवी, शाखाप्रमुख किशोर दळवी, बाळकृष्ण दळवी, प्रकाश दळवी आदी कार्यकर्ते व लाभार्थी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा