जेईई मेन तिसऱ्या सत्राचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. एनटीएनं 20, 22, 25 आणि 27 जुलै रोजी जेईई मेन परीक्षा तिसऱ्या सत्राची परीक्षा आयोजित केली होती. सुमारे 7.09 लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं दिली. NTA ने भारतातील 334 शहरे आणि 828 केंद्रांवर JEE मुख्य परीक्षा घेतली होती.
जेईई मेनचा निकाल कसा पाहायचा?
स्टेप 1: निकाल तपासण्यासाठी प्रथम अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in वर भेट द्या.
स्टेप 2: वेबसाइटवर दिलेल्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
स्टेप 3: तुमचा अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख सबमिट करून लॉगिन करा.
स्टेप 4: तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.
स्टेप 5: निकाल डाऊनलोड करुन त्याची प्रिंट आऊट घ्या
मातृभाषेत परीक्षा
नव्या शिक्षण धोरणानुसार जेईई मेन तिसऱ्या सत्राची परीक्षा इंग्रजी आणि हिंदी भाषेसह तेलुगू, तामिळ, पंजाबी, उर्दू, ओडिशा, मराठी, मल्याळम, कन्नड, बंगाली, आमामी आणि गुजराती भाषेमध्ये घेतली गेली आहे. विद्यार्थ्यांना यंदा प्रथमच त्यांच्या मातृभाषेत परीक्षा देण्याची संधी मिळाली होती. ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट अशा पद्धतीनं घेतली गेली.