*कुडाळ व मालवण शिवसेना सरपंच संघटना व आ. वैभव नाईक यांचा पुढाकार*
चिपळूण येथे उद्भवलेल्या पुरस्थितीमुळे नागरिकांच्या घरांमधील लाईट फिटिंग मध्ये पाणी जाऊन बंद पडल्या आहेत.नुकसान झालेल्या घरांमधील लाईटची दुरुस्ती करून देण्यासाठी कुडाळ व मालवण तालुक्यातील शिवसेना सरपंच संघटना व आमदार वैभव नाईक यांनी पुढाकार घेत १०० इलेक्ट्रिशियनची टीम चिपळूण येथे पाठविली आहे. आज सायंकाळी कुडाळ व मालवण येथून हि टीम चिपळूणला रवाना झाली.
शुक्रवार ६ ऑगस्ट व शनिवार ७ ऑगस्ट या दोन दिवशी हे मदतकार्य केले जाणार आहे. यामध्ये जास्तीत जास्त लोकांच्या घरांमध्ये लाईट दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत. वीज फिटिंगसाठी आवश्यक असणारे साहित्य वायर, बल्ब, केसिंग पट्टी, होल्डर,स्विच, ट्रीपर, आदी वस्तू सोबत नेण्यात आल्या आहेत. सामाजिक बांधिलकीतुन हे मदतकार्य केले जात आहे.
यावेळी कुडाळ येथे आमदार वैभव नाईक, कुडाळ शिवसेना तालुकाप्रमुख राजन नाईक, तालुका संघटक बबन बोभाटे, उपसभापती जयभारत पालव, महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत, जिल्हा परिषद सदस्य राजू कविटकर, वर्षा कुडाळकर, संजय भोगटे, अतुल बंगे, कृष्णा धुरी, स्नेहा दळवी, मथुरा राऊळ, कुडाळ सरपंच संघटना अध्यक्ष सचिन कदम, मालवण सरपंच संघटना अध्यक्ष नंदू गावडे, पावशी सरपंच बाळा कोरगावकर, हुमरस सरपंच अनुप नाईक, आवळेगाव सरपंच सुनील सावंत, नेरूर सरपंच शेखर गावडे, आंब्रड सरपंच विठ्ठल तेली, रानबांबुळी सरपंच बांबूळकर, हुमरमळा सरपंच जान्हवी पालव, सरंबळ सरपंच मनाली साटम, पिंगुळी सरपंच निर्मला पालकर, झाराप सरपंच स्वाती तेंडुलकर, आंबडपाल सरपंच प्रणिता नाईक, तुळसुली सरपंच तुळसुलकर, हिर्लोक सरपंच कन्याश्री मेस्त्री, सोनवडे सरपंच बांदेकर, आकेरी सरपंच महेश जामदार, हुमरमळा (वालावल) सरपंच हर्षदा बंगे, अजित करमलकर, भावेश परब, नरेंद्र राणे, सागर म्हाडगूत, रुपेश वाडयेकर, वसंत बांबूळकर आदींसह शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.