You are currently viewing कळसुली ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड आर्ट्स  १०० टक्के निकाल

कळसुली ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड आर्ट्स १०० टक्के निकाल

बारावीला कु. वैभवी दळवी  तर दहावीत निनाद दळवी अव्वल!

तळेरे :

कळसुली शिक्षण संघ मुंबईचे, कळसुली इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड आर्ट्स ,कळसुली या प्रशालेने याही वर्षी 100 % निकालाची परंपरा कायम ठेवली.
माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा एप्रिल/मे- 2021 या परीक्षेत प्रशालेतील 61 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. प्रविष्ट विद्यार्थ्यांपैकी सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होऊन प्रशालेचा एकूण निकाल 100% लागला आहे. यामध्ये विशेष म्हणजे 46 विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य संपादन केले.
यात प्रथम क्रमांक कुमार. निनाद तुषार दळवी94.20%, द्वितीय क्रमांक कुमार. तन्मय तुषार दळवी 93.80%तर तृतीय क्रमांक कुमार. पियुष भगवान पालव 93.20% गुण मिळवून यश संपादन केले.

उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा एप्रिल/मे- 2021 या परीक्षेत जुनियर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड आर्ट्स, कळसुली प्रशालेतून कला विभागातून 32 विद्यार्थी व वाणिज्य विभागातून 50 विद्यार्थी असे एकूण 82 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. प्रविष्ट विद्यार्थ्यांपैकी सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होऊन निकालाची परंपरा कायम राखत निकाल शंभर टक्के लागला आहे. कला विभागातून प्रथम क्रमांक विनायक विजय पालव याने पटकावला असून 84.16 टक्के गुणांनी तो उत्तीर्ण झाला आहे. तर द्वितीय क्रमांक वैशाली श्रीकृष्ण वालावलकर 83% आणि तृतीय क्रमांक अस्मिता मोहन वारंग 82.33% यांनी पटकावला आहे. वाणिज्य शाखेतून वैभवी विजय दळवी 95.83 टक्के मिळवत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. तर साक्षी अजित दळवी 93% आणि प्राची प्रकाश परब यांनी 92.83 टक्के गुण प्राप्त करत अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे.

यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष श्रीधर दळवी, कार्याध्यक्ष पुरुषोत्तम दळवी, सरचिटणीस विजय सावंत, इतर संस्था पदाधिकारी तसेच कृष्णा दळवी (स्कूल कमिटी चेअरमन), जगन्नाथ परब (स्कूल कमिटी – व्हाईस चेअरमन), नामदेव घाडीगावकर (स्कूल कमिटी सदस्य), अतुल दळवी (स्कूल कमिटी सदस्य), मुख्याध्यापक व्ही. व्ही. वगरे, वरिष्ठ शिक्षक एस. के. सावळ तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद व पालक यांनी अभिनंदन केले. प्रशालेच्या 100% निकालाची परंपरा कायम राखल्याबद्द कळसुली पंचक्रोशीतील ग्रामस्थांकडून विद्यार्थ्यांचे व प्रशालेचे अभिनंदन केले जात आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा