You are currently viewing सावंतवाडीतील राणी पार्वतीदेवी ज्युनिअर कॉलेजच्या तीनही शाखांचा १००% निकाल

सावंतवाडीतील राणी पार्वतीदेवी ज्युनिअर कॉलेजच्या तीनही शाखांचा १००% निकाल

आज संध्याकाळी बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. सावंतवाडी तालुक्यात राणी पार्वती देवी ज्युनिअर कॉलेजचा तिनही शाखांचा निकाल १००% लागला आहे.

यामध्ये विज्ञान शाखेत प्रथम मायकल डिसोजा ९५.५० टक्के, द्वितीय तपन देशमुख ९३.१६ टक्के, तृतीय अमोल गावडे ९३ टक्के मिळवले.

वाणिज्य शाखेत प्रथम मयुरी कोटकर ९६.८३ टक्के, द्वितीय पल्लवी मुळीक ९५ टक्के, तृतीय वैष्णवी धुरी ९३.८३ टक्के प्राप्त केले.

तर कला शाखेत प्रथम संघमित्रा सावंत ९४.४७ टक्के, द्वितीय आदीती सावंत, ज्योती सावंत ८८.१७ टक्के, तृतीय प्रियांका धुरी ८५.६७ टक्के प्राप्त केले.

तर व्यावसायिक अभ्यासक्रम शाखेत प्रथम जॉय डांन्टस ७७.६७ टक्के, द्वितीय सिया परब ७५.६७ टक्के, तृतीय योगेश सावंत ६९.१७ टक्के प्राप्त झाले आहे.

तसेच मार्केटिंग अँड रिटेल मॅनेजमेंट शाखेत प्रथम बंदीशा कुबल ८४.३३ टक्के, द्वितीय ग्रंथाली आचरेकर ७४. ८३ टक्के, तृतीय अंकिता मसुरकर ७२.६७ टक्के प्राप्त केले. या कॉलेजमध्ये प्रविष्ठ ८४७ पैकी ८४७ उत्तीर्ण होऊन १००% निकाल लागला‌. शाखानिहाय विज्ञान २५३, कला १६७, वाणिज्य ४०५ कन्ट्रक्शन टेक्नाॅलाॅजी ११, मार्केटिंग अँड रिटेल मॅनेजमेंट ११ असे विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे प्राचार्य, उपप्राचार्य व संस्थेच्यावतीनं अभिनंदन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा