You are currently viewing कासार्डे ज्यू.काॅलेज मधून वाणिज्य विभागातील अक्षता पाताडे अव्वल तर अनुष्का कदम द्वितीय

कासार्डे ज्यू.काॅलेज मधून वाणिज्य विभागातील अक्षता पाताडे अव्वल तर अनुष्का कदम द्वितीय

कासार्डे ज्युनियर कॉलेज १०० निकाल टक्के

तळेरे :-प्रतिनिधी

एच. एस. सी. परीक्षा 2021चा निकाल काल जाहीर झाला असून कणकवली तालुक्यातील
कासार्डे कनिष्ठ महाविद्यालयाचा एकूण निकाल 100 टक्के लागला आहे. यावर्षी कासार्डे ज्यु. काॅलेज मधून वाणिज्य विभागातील कु.अक्षता अशोक पाताडे हिने ८३.३३टक्के गुणांसह अव्वल स्थान पटकावले आहे. तर याच विभागातील कु. अनुष्का अनिल कदम हिने ८२.६६ टक्के गुणांसह कनिष्ठ महाविद्यालयात द्वितीय येण्याची मान पटकावला आहे.तर विज्ञान शाखेतील शार्दुल संतोष कोलते व कु. गौरी संतोष मिराशी यांनी ८१टक्के गुण मिळवत विभागून तृतीय येण्याचा मान मिळवला आहे.
कासार्डे ज्यु. काॅलेजचा शाखेनुसार निकाल पुढीलप्रमाणे-
कला शाखा:
एकूण प्रविष्ठ विद्यार्थी 37 उत्तीर्ण विद्यार्थी 37
प्रथम-कु. प्रणाली समाधान धुरी -६३.५०टक्के
व्दितीय – अपेक्षा जयप्रकाश बंड -६२.३३ टक्के
तृतीय-ऋतिका सुनिल जाधव-६१.३३टक्के
वाणिज्य शाखेत: एकूण प्रविष्ठ विद्यार्थी- 94, उत्तीर्ण विद्यार्थी 94

प्रथम- अक्षता अशोक पाताडे-८३.३३टक्के
व्दितीय- अनुष्का अनिल कदम-८२.६६टक्के
तृतीय- वैष्णवी समीर जाधव-७८.५०टक्के

विज्ञान शाखेत :एकूण प्रविष्ठ विद्यार्थी- 79, उत्तीर्ण विद्यार्थी 79
शार्दुल संतोष कोलते व कु.गौरी संतोष मिराशी -८१ टक्के गुणांसह विभागून प्रथम
व्दितीय- जान्हवी संतोष राणे-८०.३३टक्के
तृतीय-कु. रमिजा मुश्ताक शिरगावकर-७९.३३टक्के
यावर्षीही उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेत कासार्डे कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यशाची परंपरा कायम ठेवली आहे.
या यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे कासार्डे विकास मंडळ मुंबईचे अध्यक्ष परशुराम माईणकर, मानद सरचिटणीस उपेंद्र पाताडे, स्थानिक व्यवस्था समितीचे कार्याध्यक्ष प्रभाकर कुडतरकर, प्राचार्य मधुकर खाड्ये, पर्यवेक्षक नारायण कुचेकर तसेच विद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गानी अभिनंदन केले.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा