कधी कधी आयुष्यात..
फुलांसाठी,
काटेही टोचून घ्यावे लागतात.
नाजूक पाकळ्या त्या..
फुलांच्या,
हळुवारपणे गोंजाराव्या लागतात.
भीती असते त्या कोमेजण्याची..
कुस्करण्याची,
निष्पापपणे गळून पडण्याची.
लाडीकपणे झालेल्या स्पर्शाने..
त्या हुरळून जातात…
हसतात, खुश होतात.
त्या खुशीतच लालेलाल होतात.
अगदी लाली आलेल्या गालासारख्या.
पण,,,
रक्ताळलेल्या त्याच हातांनी…
काही समजण्या अगोदर,
त्या देटांसहीत तुटल्या जातात…
कायमच्याच,
विस्मृतीत जाण्यासाठी…!!
(दीपी)
८४४६७४३१९६