पुरपरिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी नद्यातील गाळ काढण्यावरच भर…
सावंतवाडी
कळणे मायनिंगवर घडलेला अपघात लक्षात घेता त्या ठिकाणी होणारे उत्खनन आणि वाहतूक तात्काळ थांबविण्यात यावी, असे आदेश संबधित कंपनीला दिल्या आहेत. पुढील आदेश होईपर्यंत ही खाण बंद राहणार, असे प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांनी सांगितले. दरम्यान पुरपरिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तेरेखोल खाडीतील गाळ काढण्यावर आता जास्त भर देण्यात आला आहे. तशा सुचना संबधित ग्रामपंचायतींना देण्यात आल्या आहेत, असे खांडेकर म्हणाले.
ते आज येथील तहसीलदार कार्यालयात पत्रकारांशी बोलत होते.यावेळी ते म्हणाले, सावंतवाडी तालुक्यातील पुरपरिस्थितीत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचे पंचनामे बर्याच अंशी पुर्ण करण्यात आले आहेत. त्याच बरोबर तौक्ते वादळाची नुकसान भरपाई लवकरात-लवकर मिळवून देण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत, असे श्री खांडेकर म्हणाले.