लवकरच बांधकाम, फायनान्स क्षेत्रात किर्लोस्कर ग्रुप चे प्रदार्पण..
किर्लोस्कर इंडस्ट्रीज लिमिटेडने काळाचा वेध घेत व्यवसाय विस्तारासाठी ‘मिशन लिमिटलेस’ हाती घेतले आहे. या उपक्रमांतर्गत किर्लोस्कर ग्रुपच्या नव्या लोगोसह अवांते स्पेसस आणि अर्का फिनकॅप या बिगर बँकिंग फायनान्स कंपनी क्षेत्रात उतरत आहे. या दोन्हींमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली जाईल, अशी माहिती किर्लोस्कर ऑइल इंजिन्सचे कार्यकारी अध्यक्ष अतुल किर्लोस्कर आणि किर्लोस्कर न्यूमॅटिकचे कार्यकारी अध्यक्ष राहुल किर्लोस्कर यांनी संयुक्तरित्या ऑनलाईन स्वरुपात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
तसेच थ्रीडी प्रिंटिंग, इंटरनेट ऑफ थिंग्स, डिजिटायझेशन, आर्टिफिशियल इंटेलिजन्स या सारख्या नवतंत्रज्ञान आणि प्रक्रियांचा अंगीकार यात केला जाणार आहे.
यावेळी अतुल किर्लोस्कर म्हणाले, गेल्या एकशे तीस वर्षात किर्लोस्कर समूहाने उद्योग क्षेत्राच्या विकासात मोठे योगदान दिले आहे. समुहाचा विस्तार करताना आता अवांते स्पेसस च्या माध्यमातून रियल इस्टेट आणि अर्का फिनकॅप च्या माध्यमातून फायनान्स क्षेत्रात उतरत आहोत. ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन कार्यरत किर्लोस्कर समूह पुण्यातून बांधकाम व्यवसायाची सुरुवात करणार आहे. अर्का फिनकॅप ची स्थापना मागील वर्षी किर्लोस्कर ऑईल इंजिन्स च्या मालकीची कंपनी म्हणून करण्यात आली आहे.